शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसाठी एआयएसएफ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 17:15 IST

विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी आणि शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत एआयएसएफने सरकारविरोधात घोषणाबाजीसह आंदोलन केले

ठळक मुद्देआंदोलन : गळती थांबविण्यात सरकार अफयशी ठरल्याचा आरोप दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत.

लोकमत न्यूज नेटवर्क:नाशिक : कोरोना काळातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण शुल्क माफी करावे तसेच फ्री शिप पूर्ववत करण्यासह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनतर्फे सोमवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.       गतवर्षीपासून कोविड-१९ मुळे विद्यापीठ व महाविद्यालयांचे कॅम्पस ठप्प पडले असून ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी 'डिजिटल डिव्हाईड' चे बळी ठरत आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी आणि शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत एआयएसएफने सरकारविरोधात घोषणाबाजीसह आंदोलन केले. तसेच शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा ५ जुलैला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही एआयएसएफतर्फे देण्यात आला आहे. यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांच्यासह अविनाश दोंदे, तल्हा शेख, अक्षय दोंदे, गायत्री मोगल, जयंत विजयपुष्प, प्रज्वल खैरनार, प्राजक्ता कापडने, प्रणाली मगर, शरद खाडे आदींनी आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या.एआयएसएफच्या मागण्या- राज्यातील शाळा, व्यावसायिक तसेच गैर व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ७० टक्के फी माफ करण्याचे आदेश राज्य सरकारने काढावेत, उर्वरित ३० टक्के फी ही शासनाने महाविद्यालयांना ग्रांट म्हणून द्यावी.- ऑनलाईन शिक्षण सुविधेच्या अभावापोटी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत.- महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे नियमन कायदा २०१५ तील विद्यार्थी विरोधी तरतुदी दुरुस्त करावी,- सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत सर्व शिष्यवृत्ती योजनांची मदत विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा.- रद्द केलेली ओबीसी, एससी, व एसटी प्रवर्गासाठीची फ्रीशिप योजना शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी लागू करावी.- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ करावे आणि कोविड पार्श्वभूमीवर शैक्षणिक कर्ज वाटपात २५ टक्के वाढ देण्याचे आदेश बँकांना द्यावेत.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी