शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर भरतीच्या बनावट जाहिरातीने तरुणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:09 IST

लष्कराच्या देशभरातील युनिट्स मध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात वॉट्सअपवर  फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले.

ठळक मुद्देहजारो तरुण कॅम्पमध्ये : वर्षभरापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती४४ जागांची भरती प्रक्रि या होणार असल्याचे संदेश

देवळाली कॅम्प : लष्कराच्या देशभरातील युनिट्स मध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात वॉट्सअपवर  फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानंतर आलेले तरुण निराश होऊन परतले.देवळालीतील टीए बटालीयनमध्ये ४४ जागांची भरती प्रक्रि या होणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरल्यामुळे राज्यभरातून हजारो युवक शुक्रवारी देवळालीत दाखल झाले होते. आर्टिलरी सेंटरमध्ये आल्यानंतर अशी कोणतीही भरती नसल्याची माहिती त्यांना मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संदर्भात काही तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी भरतीची बनावट जाहिरात मोबाइलवर फिरत असल्याचे दाखविले. सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्षभरात दुसऱ्यांना अशा प्रकारची जाहिरात आल्याने हजारो तरुणांच्या भावनेशी खेळ खेळला जात आहे.या जाहिरातीमध्ये देशभरातील बेळगाव, बेंगळुरू,देहरादून, कोल्हापूर, नागपूर, देवळाली, तामिळनाडू, कानपूर, सिकंदराबाद या ठिकाणी डिसेंबर १७ ते एप्रिल १८ या दरम्यान जी. डी. सोल्जर व क्लार्क या पदांसाठी एकूण ३७९ जागेसाठी भरती होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. देवळालीतील टीए भरतीकरिता १७ ते ३१ मार्च दरम्यान ४४ जागांसाठी राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बुलढाणा, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, परभणी यांसह विविध जिल्ह्यातील हजारो युवक देवळालीत दाखल झाले होते. मात्र धोंडीरोड टीए बटालियनच्या कार्यालयात भरतीची चौकशी केली असता अशी कोणतीही भरती या कार्यालयाकडून केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भरतीप्रक्रि येबाबत माहिती घेतली असता लष्कराकडून कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NashikनाशिकSocial Mediaसोशल मीडिया