नाशिकरकरांना घरपोच भाजीपाला ;गर्दी टाळण्याचा पर्याय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:07 PM2020-04-06T16:07:14+5:302020-04-06T16:09:41+5:30

कोरोना वायरसच्या संकटाच्या काळात शेतकयांनी एकत्र येत सुरू केलेले कृ षी माल प्रक्रिया व विपणन उद्योग व विविध शेतकरी गट यांनी त्याच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाईन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉर्इंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या सेवेअंतर्गत आतापर्यंत चार दिवसात शहरातील विविध भागातील नागरिकांना वेगवेगळ्या भाजीपाला व फळांचे बास्केट घरपोच देण्यात आले आहेत

Nashikarkar to avoid home-grown vegetables; | नाशिकरकरांना घरपोच भाजीपाला ;गर्दी टाळण्याचा पर्याय :

नाशिकरकरांना घरपोच भाजीपाला ;गर्दी टाळण्याचा पर्याय :

Next
ठळक मुद्देभाजी, फळांचे बास्केट पोहचले थेट ग्राहकांच्या दरातकोरोना संकटाच्या काळात शेतकरी कंपनीची सेवा

नाशिक: कोरोना वायरसच्या संकटाच्या काळात शेतकयांनी एकत्र येत सुरू केलेले कृ षी माल प्रक्रिया व विपणन उद्योग व विविध शेतकरी गट यांनी त्याच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाईन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉर्इंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या सेवेअंतर्गत आतापर्यंत चार दिवसात शहरातील विविध भागातील नागरिकांना वेगवेगळ्या भाजीपाला व फळांचे बास्केट घरपोच देण्यात आले आहेत
घरपोच सेवेअंतर्गत नागरिकांनी फळं, भाजीपाला मिळविण्यासाठी समाबांधित गट अथवा उद्योगाकडे आॅनलाइन मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीकडून एका आठवड्यांचे साप्ताहिक बास्केट नागरिकांना घरपोच देण्यात येते. नाशिक शहराच्या विविध सेवा देण्यासाठी डिलिव्हरी व्हॅनही सुरू करण्यात येणार आल्या असून किमान मानवी संपर्क व्हावा आणि सुरक्षित फळे व भाजीपाला नागरिकांना पोहचविण्याठी यातील एका कंपनीने नाशिक शहरात आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड,आनंदवल्ली, गोविंदनगर, नाशिक रोड, तपोवन लिंक रोड, काठे गल्ली, अशोका मार्ग याभागात पीक अप पॉइंट सुरू केले आहेत. यासेवांतर्गत २९ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत विविध नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार ७१४ बास्केट घरपोच देण्यात आले होते. त्यात  हळूहळू वाढ होक असल्याची माहती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान,   जिल्हा प्रशासनाकडे नोंद नसलेले काही शेतकरी गटही अशी सेवा देत असून त्यामुळे नाशिककरांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरपोच भजीपाल्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

Web Title: Nashikarkar to avoid home-grown vegetables;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.