नाशिक परिमंडळाची थकबाकी १९१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:34 PM2019-08-28T18:34:21+5:302019-08-28T18:35:09+5:30

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल ...

nashik,area,has,an,outstanding,balance | नाशिक परिमंडळाची थकबाकी १९१ कोटी

नाशिक परिमंडळाची थकबाकी १९१ कोटी

Next
ठळक मुद्देवसुलीची सक्ती : कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ग्राहकांसह कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश देत महिनाभरात वसुलीचे धोरण स्वीकारले आहे.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटींवर पोहचली असून, वीज बिल थकविलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यात आली आहे. ९० टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणाºया अधिकाºयांवरदेखील शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत कोकण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार कळम यांनी दिले आहेत.
एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांतील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही ९४४ कोटींची चालू थकबाकी असून, यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाºया १२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत अधिकाºयांच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांनी हे आदेश दिले आहेत.
वीज बिल थकीत ग्राहकांचा पुरवठा तोडल्यानंतर संबंधितांनी अनधिकृत वीजपुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरु द्ध गुन्हा नोंद करण्याच्या स्पष्ट सूचनादेखील काळम यांनी दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू न करण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना विहित प्रक्रि येद्वारे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ द्यावी. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत वीज जोडणी न घेणाºया मंडळांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी, असे आदेश यावेळी काळम पाटील यांनी दिले.

Web Title: nashik,area,has,an,outstanding,balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.