अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगाराची चौघांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:56 IST2017-09-04T23:52:25+5:302017-09-04T23:56:51+5:30

nashik,Ambad,Industrial,Colony,loot | अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगाराची चौघांकडून लूट

अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगाराची चौघांकडून लूट

ठळक मुद्देरोख रक्कम व मोबाइल बळजबरीने हिसकावल्याची घटनाअंबड पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल

नाशिक : कामावरून घरी परतणाºया कामगारास चौघा संशयितांनी अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल बळजबरीने हिसकावून घेतल्याची घटना रविवारी (दि़३) सायंकाळच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीत घडली़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत कामास असलेला गोपीनाथ आत्माराम गायकवाड (१९, रा. चिंचोळे शिवार, अंबड) हा युवक सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सायकलवरून गरवारे पॉइंटजवळून जात होता़ यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेले संशयित शादाब रफिक पठाण (२२, रा. उत्तमनगर, सिडको), मुस्ताक अली शौकत अली शेख (१९, रा. पवननगर) आणि दोन साथीदारांनी त्यास अडविले़ यानंतर खिशातील साडेचार हजार रुपये रोख व पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल असा साडेनऊ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला़
याप्रकरणी गायकवाडच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पठाण व शेख या दोघांनाही अटक करण्यात आली आहे़ या दोघांसोबत असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत़

Web Title: nashik,Ambad,Industrial,Colony,loot