शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

नाशिकमधील १६४ भिकाऱ्यांची पुनर्वसनासाठी रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:26 IST

नाशिक : शहरातील उड्डाणपूल, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यावर थांबून वाहनधारक तसेच नागरिकांकडून भीक मागणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती केली होती़ या विनंतीनुसार शहर पोलीस पोलिस आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि़७)शहरात भिक्षेकरी मुक्त अभियान राबविण्यात आले़ पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीतून १६५ भिक्षेक-यांना पकडून न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर, पुणे, नाशिक, मनमाड व नाशिक पुर्नवसनासाठी रवाना केले़

ठळक मुद्देशहर भिक्षेकरी मुक्त अभियान : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांची कारवाई

नाशिक : शहरातील उड्डाणपूल, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यावर थांबून वाहनधारक तसेच नागरिकांकडून भीक मागणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती केली होती़ या विनंतीनुसार शहर पोलीस पोलिस आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि़७)शहरात भिक्षेकरी मुक्त अभियान राबविण्यात आले़ पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीतून १६५ भिक्षेक-यांना पकडून न्यायालयाच्या आदेशानुसार अहमदनगर, पुणे, नाशिक, मनमाड व नाशिक पुर्नवसनासाठी रवाना केले़

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये शहरातील विविध सिग्नल्स उड्डाणपुल, रस्ते या ठिकाणी सोमवारी विशेष मोहिम राबविली़ या मोहिमेत शहरातील १६४ भिक्षेक-यांना पकडण्यात आले़ त्यामध्ये ५५ पुरुष, ४४ महीला, ३९ मुले व २६ मुलींचा समावेश आहे़ पोलिसांनी या सर्वांना पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये ठेवले होते़ या ठिकाणी या सर्वांना अंघोळ, त्यांचे केशकर्तन, नवीन कपडे व जेवन देण्यात आले़ यानंतर या सर्व भिका-यांना जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके यांच्यासमोर हजर करण्यात आले़

पोलिसांनी पकडलेल्या या भिका-यांची विभागणी करून अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील गर्व्हमेंट मेल रिसिंग सेंटर, पुणे येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र तसेच अनुरक्षण संघटना संचलीत मुलांचे निरीक्षक गृह मनमाड व मालेगाव या ठिकाणी पाठविण्यात आले़ शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा व सत्र न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण, शहर पोलीस आयुक्तालय, महिला व बालकल्याण विभाग,जिल्हा रुग्णालय, तसेच बॉर्न टू हेल्प फाऊंडेशन, सुख- समृद्धी, सक्षम, चाकं शिक्षणाची या सेवाभावी संस्थाचा समावेश होता़

टॅग्स :NashikनाशिकBeggarभिकारीPoliceपोलिस