शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कॉँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:12 IST

जय हिंदू राष्ट्र नावाने आलेल्या पत्रात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुनगाण का करतो, तुला शेवटची संधी नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेल, असे सांगत समजले नाही तर जीव गमवशील, अशी धमकी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे...नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेलसमजले नाही तर जीव गमवशील

नाशिक : शहर कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र प्राप्त झाले असून, या प्रकरणी त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.जय हिंदू राष्ट्र नावाने आलेल्या पत्रात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुनगाण का करतो, तुला शेवटची संधी नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेल, असे सांगत समजले नाही तर जीव गमवशील, अशी धमकी देण्यात आली आहे. २०१४ मध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहचावे यासाठी सर्वात मोठी गांधी टोपी बनविली होती. तीन बाय पन्नास फुटांच्या या टोपीची गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड व लिम्का बुक आॅफ रेकार्डला नोंद झाली होती. याबाबतचे प्रमाणपत्रही ठाकूर यांना प्राप्त झालेले आहे. यात धर्तीवर ठाकूर यांनी २ आॅक्टोबर २०१७ रोजी गांधी यांचा सर्वात मोठा चष्मा तयार करत त्यांना आदरांजली वाहली होती. या माध्यमातून गांधींची ओळख आजच्या पिढीला व्हावी, अशी भूमिका होती. याशिवाय गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याकडून विविध कार्यक्र म घेतले जातात. सोमवारी (दि.१५) शहर कॉँग्रेस कमिटीत हे पत्र प्राप्त झाले आहे.सदर धमकीचे पत्र व त्यासोबत गांधी हत्या गोडसेकडूनच अन्य गूढ कोणीही नव्हते! या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर काट मारण्यात आलेली प्रत प्राप्त झाली आहे.......मला यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. तसेच गांधी जयंतीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या रथाची काचदेखील फोडण्यात आली आहे. या प्रकाराची पोलिसांत तक्र ार करण्यात आली आहे.- वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, कॉँग्रेस सेवादल

टॅग्स :congressकाँग्रेसNashikनाशिकPoliticsराजकारण