नाशिक : काही दिवसांपासून घटलेल्या किमान तपमानामुळे हुडहुडी भरलेल्या नाशिककरांना आज अल्पसा दिलासा लाभला. ५ अंशांपर्यंत घसरलेल्या तपमानात आज दोन अंशांनी वाढ झाली; मात्र तरी शहरात गारठा कायम होता. उत्तर भारतातून आलेल्या शीतवाऱ्यामुळे शहरात थंडीची लाट आली आहे. काल (दि.२२) किमान तपमानाचा पारा ५.५ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे शहरवासीय गारठून गेले होते. पहाटे व सायंकाळी रस्त्यांवरच्या वर्दळीत घट झाली होती; मात्र आज किमान तपमान वाढून ७ अंशांपर्यंत वाढले. दरम्यान, थंडीमुळे नागरिकांच्या दिनचर्येत बदल झाला आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण निर्माण न झाल्यास शहरात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या शहरात पहाटेच्या वेळी व रात्री आठनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)
नाशकात गारठा कायम
By admin | Updated: January 23, 2016 23:16 IST