शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: वर्ष पुर्ण झाले अन् चोरटे पुन्हा आले, अंबडच्या इंडियन बँकेत वर्षभरानंतर पुन्हा चोरीचा प्रयत्न

By संकेत शुक्ला | Updated: July 19, 2024 19:34 IST

Nashik News: अंबड येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेल्या इंडियन बँकेचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न करण्यात आला.

- नरेंद्र दंडगव्हाळसिडको - अंबड येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेल्या इंडियन बँकेचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे याच बँकेत वर्षभरापूर्वी लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यातील संशयित मोकाट असताना पुन्हा तसाच प्रकार घडल्याने धूम स्टाईल चोरीच्या प्रयत्नामुळे बँक प्रशासनाबरोबरच पोलिसांनाही आव्हान दिले गेले आहे.

गॅस कटरने गज कापून वरच्या मजल्यावरील स्लॅब फोडून बँकेत प्रवेश करण्याचा झालेला प्रयत्न किमान १ तास घेणारा होता. सुरक्षारक्षक असता तर ही घटना टळली असती, तसेच पोलिसांचे पेट्रोलिंगही कमी झाल्याने असे प्रकार वाढल्याचे बोलले जाते आहे. अंबड येथील इंडियन बँक गुरुवारी बंद करण्यात आल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जाते. छन्नी हातोड्याचा वापर करून बँकेच्या वरच्या रिकाम्या जागेतील स्लॅब चोरट्याने यासाठी फोडला. फोडलेल्या स्लॅबमधून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना बँकेतील सायरन वाजल्याने चोरट्याने येथून पळ काढला, अशी प्राथमिक माहिती आहे.

याबाबतची माहिती कळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी सकाळी बँकेचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक लॅबचे एक्सपर्ट दाखव झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. संशयित दरोडेखोरांचे शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी