राज्य अजिंक्यपद कुमार कुस्तीसाठी नाशिकचा संघ जाहीर
By Admin | Updated: November 17, 2014 00:23 IST2014-11-17T00:21:43+5:302014-11-17T00:23:13+5:30
राज्य अजिंक्यपद कुमार कुस्तीसाठी नाशिकचा संघ जाहीर

राज्य अजिंक्यपद कुमार कुस्तीसाठी नाशिकचा संघ जाहीर
नाशिक : राज्य अजिंक्यपद कुमार कुस्ती स्पर्धेसाठी नाशिक शहर संघाची घोषणा आज करण्यात आली़ यासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धांतून या संघाची निवड करण्यात आली़ दांडेकर-दीक्षित तालीम संघ येथे या स्पर्धा पार पडल्या़ यामध्ये जिल्'ातील ६५ कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता़ स्पर्धेचे उद्घाटन तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते झाले़ यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक आबा घाडगे, तालीम संघाचे उपाध्यक्ष संजय खैरे, दत्तू पाटील, शरद प्रभाणे, बाळू काकड, राहुल बोडके, हिरामण वाघ आदि उपस्थित होते़ या स्पर्धेतील विजेते, उपविजेते तसेच निवड झालेले खेळाडू याप्रमाणे - ४२ किलो गट- संदेश गिते, विकास आखाडे, ५० किलो- तानाजी आडके, प्रमोद लांडगे, ५५ किलो- बाळू बोडके, अमोल लांडगे, ५८ किलो- रामदास चकोर, ६५ किलो- आकाश जाधव, ६९ किलो- शुभम शिंदे, कल्पेश चौधरी, ७६ किलो- अमृता ठाकरे, उमेश काकड़ खुला गट- राहुल जाधव़ २६ नोव्हेंबरला पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे़ स्पर्धेत पंच म्हणून सर्जेराव वाघ, पिंटू तांबोळी, संदीप निकम, तुषार कालेकर, राजू ठोंबरे, उत्तम कर्पे, कृणाल गोसावी यांनी काम पाहिले़