शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिली महाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकललेली टायपिंगची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 16:34 IST

महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकलली परीक्षा रविवारी संपन्ननाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर शांततेत परीक्षा परीक्षा सुरळीत पार पडल्याने विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

नाशिक : भारिप बहुजन महासंघाने बुधवारी (दि.3) पुकारलेल्या महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते. परंतु परीक्षा परिषदेने बुधवारी परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची रवीवारी परीक्षा घेऊन पुन्हा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार परीक्षेचे नियोजन पूर्ववत केले आहे. कोरेगाव भीमा प्रकणानंतर राज्यभरात उसळलेल्या हिंसाचारामुळे अनेक विद्यार्थ्यांना बुधवारी परीक्षा केंद्रावरून पोहोचता आले नाही. तर परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा होऊ न शकल्याने त्यांना माघारी परतावे लागले होते. या सर्व विद्यार्थ्यांची रविवारी परीक्षा पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी सूटकेचा निश्वास टाकला आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे मंगळवारपासून (दि. 2) सुरू झालेल्या ऑनलाइन कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा तसेच सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाची एम.फार्मसी परीक्षेचा बुधवारी पेपर होता. परंतु, महाराष्ट्र बंदचे पडसाद नाशिकमध्ये तीव्रतेने उमटल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये मंगळवारपासून घेण्यात येणारी ऑनलाइन टायपिंग परीक्षाही प्रभावित झाली होती. जिल्ह्यातील 13 केंद्रांवर 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन टायपिंग परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु बुधवारी (दि. 3) या परीक्षांच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र बंदमुळे परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्याथ्र्यामध्ये निराशा पसरली. मात्र या निर्णयामुळे जे विद्यार्थी बंदमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत त्यांना दिलासा मिळाला होता. त्यांनी अखेर रविवारी टायपिंगचा पेपर दिल्याने समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकStudentविद्यार्थी