शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शंभर एकर जागेत साकारणार अत्याधुनिक ‘नाशिक वेलनेस हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:20 IST

नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

ठळक मुद्दे२०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मदत होणार

नाशिक : आयुर्वेदापासून तर थेट ताणतणाव व्यवस्थापनासाठी ध्यानधारणेपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य उपचारपध्दती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटनाच्या सुवर्णत्रिकोणामध्ये ‘नाशिक वेलनेस हब’ उभारले जाणार आहे. या वेलनेस हबसाठी इगतपुरी-त्र्यंबके श्वरच्या दरम्यान येत्या महिनाभरात जागा निश्चित केली जाणार आहे.‘हेल्थ टुरिझम’ला चालना देण्यासाठी तसेच नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या २०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार असल्याचा विश्वास पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आशियामधील सर्वाेत्तम सोयीसुविधा व उपचारपध्दतीच्या दृष्टीने व्यापक असे वेलनेस हब नाशिकमध्ये उभे राहणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे. हे वेलनेस हब मुंबईपासून जवळ असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसमवेत विदेशी पर्यटकांनाही वेलनेस हब आक र्षित करणारा ठरणार असल्याचे राठोड म्हणाले.

ताणतणावाचे व्यवस्थापन करत नैराश्यावर मात करता यावी, स्मरणशक्ती वृध्दिंगत व्हावी तसेच विविध आजारांवर आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर, बॉडी मसाजसह ध्यानधारणा, योगा केंद्रासह विविध प्रकारच्या आरोग्याशी संबंधित सुविधा वेलनेस हबद्वारे पर्यटकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे शंभर एकर जागेवर उभे राहणारे वेलनेस हब हे भारतातील पहिले हब ठरणार आहे. कारण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये वेलनेस हब अद्याप कुठेही अस्तित्वात नाही. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी.पी.पी) तत्त्वावर हे हब साकारले जाणार आहे.----

जागतिक दर्जाच्या सुविधापर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितीत पीपीपी तत्त्वानुसार विकसित केल्या जाणाºया ‘नाशिक वेलनेस हब’मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपचार पध्दती व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. वैद्यकशास्त्रानुसार उपचाराच्या आयुर्वेदापासून वॉटरथेरपीपर्यंत सर्वच पध्दतीचा लाभ नागरिकांना याद्वारे घेता येणार आहे. एकूणच या वेलनेस हबमुळे नाशिकच्या कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन, धरण पर्यटनासह धार्मिक पर्यटनाला अधिक चालना मिळण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे पर्यटकांचा मुक्काम नाशिक जिल्ह्यात वाढीस लागेल.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिकtourismपर्यटन