शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'लोकमत सरपंच अवॉर्ड’ने नाशिकचे स्मार्ट सरपंच सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:37 IST

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या 13 सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या 13 सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. 'जो गावची शान, त्याचाच हा बहुमान' असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने 'सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्रम राज्यभर सुरू केला.गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या विजेत्या सरपंचांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

नाशिकनाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या 13 सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. 'जो गावची शान, त्याचाच हा बहुमान' असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने 'सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्रम राज्यभर सुरू केला. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या हा सोहळा मुंबई - आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील 'रॉयल हॉल'मध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, वनधिपती विनायकदादा पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जयंत पाटील, अर्चना जतकर, बीकेटीचे अ‍ॅग्री सेलचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटीचे अधिकृत वितरक सूरज धुत, सुयोजित ग्रुपचे संचालक अनंत राजेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,यांनी विजेत्या सारपंचांचे अभिनंदन करत राज्याच्या अन देशाच्या विकासासाठी गावांचा विकास तितकाच गरजेचा असतो. गावपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करणाऱ्या सरपंचांची भूमिका महत्त्वाची असते. सरपंच जागृत असला तर त्या गावाचा कायापालट झालेला दिसून येतो, असे सांगितले, आणि 'लोकमत'ला धन्यवाद दिले.

सरपंचांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्याने या पदाची शोभा अधिकच वाढली. महिला सरपंचदेखील पुरुष सरपंचांच्या खांद्याला खांदा लावून धाडसाने विकासकामे पाठपुरावा करून मार्गी लावत आहे, याचा अनुभव मला जिल्हा परिषदेत येतो. मानवी विकासाची कामे करण्यावर जिल्ह्यातील सरपंचांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून करण्यावर भर द्यावा, कौशल्य विकास कडे लक्ष पुरवावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांनी सांगितले. 

जीवनाची गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असलेली कामे करण्यावर भर सरपंचांनी द्यावा. गावे स्मार्ट झालीत तर देश आपोआपच स्मार्ट होईल. सरपंचांच्या भरवशावर येणाऱ्या काळात देश महाशक्ती होणार आहे, असा विश्वास माजी मंत्री वनधिपती विनायकदादा पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. गेल्या १९फेब्रुवारी रोजी लोकमतच्या नाशिक शहर कार्यालयात झालेल्या निवड समितीने बारकोड पद्धतीने विविध १३ गटांमध्ये सरपंचांची निवड निश्चित करण्यात आली. गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या विजेत्या सरपंचांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक चेअरमन सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील जयंत पाटील व महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांचे मार्गदर्शन  उपस्थित सरपंचांना लाभले.

बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक होते. राज्यात लोकमतने प्रथमच सुरू केलेल्या या उपक्रमास सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध कॅटेगिरीमध्ये जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक सरपंचांनी प्रवेशिका दाखल केल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती. या सोहळ्यास स्पर्धेत सहभागी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक किरण अग्रवाल यांनी केले.नाशिकचे विजेते सरपंच

जलव्यवस्थापन - कुमारी सोनाली कामडी (बोरवड, पेठ)

विजव्यवस्थापन - अनिता भुसारे (हनुमंतपाडा, पेठ)

शैक्षणिक विकास - रामकृष्ण कंक (कारसुल, निफाड)

स्वच्छता अभियान- रमेश दरोडे (धानपाडा, पेठ)

आरोग्य - संदीप आहेर (भलूर, नांदगाव)

पायाभूत सुविधा - संपत धोंगडे (कुरेगाव, इगतपुरी)

ग्रामसुरक्षा - छाया नागरे (वडझीरे, सिन्नर)

रोजगार निर्मिती - बाजीराव गायकवाड (व्हिलोडी, नाशिक)

पर्यावरण संवर्धन - जयाबाई दळवी (कलमदरी, नांदगाव)

ई-प्रशासन-  यशोदा चौधरी (तोंदवल, पेठ)

कृषी तंत्रज्ञान - सुनीता कळमकर (जाखोरी, नाशिक)

उदयोन्मुख नेतृत्व - प्रकाश मौळे (बेरवळ, त्रंबकेश्वर)

सरपंच ऑफ दी इयर- नरेंद्र जाधव (अवनखेड, दिंडोरी) या सरपंचांना गौरविण्यात आले.

11 कॅटेगिरीसह दोन विशेष पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण इ. प्रशासन/लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान या 11 कॅटेगिरीत केलेल्या कामांची दखल घेऊन या प्रत्येक क्षेत्रासाठी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले.  याशिवाय 'उदयोन्मुख नेतृत्व आणि 'सरपंच ऑफ द इयर' हे दोन विशेष पुरस्कार देण्यात आले.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Nashikनाशिक