शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:06 IST

राज्यात महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणखी एक घाव केला.

Shiv Sena News: नाशिकमधील राजकारणाच्या दृष्टीने मंगळवारी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एकाच वेळी अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे भगदाड पडले. २०१७ मध्ये ३३ नगरसेवक निवडून आणलेल्या ठाकरेंकडे आता ९ माजी नगरसेवक शिल्लक असून, निवडणुकीपर्यंत त्यातील किती राहतील, असाही प्रश्न आता चर्चिला जात आहे.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजकीय घडामोडींनी मंगळवारचा (१७ जून) दिवस गाजला. एकीकडे भाजपात एक डड़ान माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना दुसरीकडे शिंदेसेनेतही इनकमिंग झाले. 

वाचा >>'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण बाळा दराडे-गामणे, सीमा गोकुळ निगळ, यांच्यासह माजी नगरसेवक पुजाराम गामणे, पुंडलिक अरिंगळे यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेसेनेत प्रवेश केला. 

महापालिका निवडणुकीमुळे पक्षांतराचे वारे

शिवसेना दुभंगल्यानंतर अनेक माजी नगरसेवक शिंदेसेनेत दाखल झाले होते. मात्र, मध्यंतरी त्याला ब्रेक लागला होता. आता, महापालिका निवडणुका घोषित झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रवेशाला वेग आला आहे. भाजपाकडे मंगळवारी गाजावाजा करीत पक्ष प्रवेश सुरू असताना शिंदेसेनेत देखील चार माजी नगरसेवकांचे प्रवेश झाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे उरले नऊ माजी नगरसेवक

२०१७ महापालिकेच्या नेत्वडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक, तर भाजपाचे ६६ नगरसेवक निवडून आले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धवसेनेतील ३५ पैकी १९ नगरसेवक शिंदेसेनेत, तर ४ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. ३ माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे उद्धवसेनेत आता फक्त माजी ९ नगरसेवक शिल्लक असून येणाऱ्या काळात यातील बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेत सामील होतील, असा दावा उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण