नाशिक ३५.५ अंशांवर स्थिरावले

By Admin | Updated: May 29, 2016 22:45 IST2016-05-29T22:44:12+5:302016-05-29T22:45:13+5:30

ढगाळ वातावरण : यावर्षी ३४.३ सर्वांत कमी; तर ४१ अंश सर्वाधिक

Nashik settled at 35.5 degree Celsius | नाशिक ३५.५ अंशांवर स्थिरावले

नाशिक ३५.५ अंशांवर स्थिरावले

नाशिक : मे महिन्याचा उत्तरार्ध नाशिककरांना दिलासा देणारा ठरला असून, मागील चार दिवसांपासून कमाल तपमान ३५.५ अंशाच्याआसपास स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव सध्या येत आहे.
मागील बुधवारी (दि.१८) शहराचे तपमान ४१अंशांवर पोहचले होते. यावर्षी सर्वाधिक तपमानाची नोंद या दिवशी हवामान खात्याने केली. याबरोबरच हवेतील आर्द्रताही वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका अन् उकाड्याचा दुहेरी त्रास सहन करावा लागत होता; मात्र दोन दिवसांतच लहरी निसर्गाने आपले रूपडे बदलले व तपमानात घसरले. शहरात वाऱ्याचा वेगही वाढल्याने आर्द्रता कमी झाली. सध्या नाशिकरांना सुखद वातावरण अनुभवयास येत आहे. एप्रिल महिन्यापासून सूर्य तळपत असल्याने नाशिककरांनी ‘मे’च्या उन्हाची धास्ती घेतली होती; मात्र उत्तरार्धात नभही दाटून येऊ लागले आणि तपमानही घसरल्याने मे महिन्याचा समारोप दिलासादायक होत असल्याने नाशिककर आनंदी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik settled at 35.5 degree Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.