राज्यस्तरीय तलवारबाजीत नाशिक उपविजेते
By Admin | Updated: July 23, 2014 00:27 IST2014-07-22T23:31:45+5:302014-07-23T00:27:13+5:30
राज्यस्तरीय तलवारबाजीत नाशिक उपविजेते

राज्यस्तरीय तलवारबाजीत नाशिक उपविजेते
नाशिक : महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या वतीने वाशिम येथे झालेल्या सबज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत दोन
सुवर्ण पदकांसह आठ पदके पटकावत नाशिकचा संघ उपविजेता ठरला़
या स्पर्धेत राज्यभरातून ४३५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता़ नाशिकच्या खेळाडूंनी वैयक्तिक व प्रकारात २ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य अशी ८ पदके पटकावली़
सांघिक स्पर्धेत फ ॉईल प्रकारात नाशिकच्या संघाने सुवर्ण पदक तर ईपी प्रकारात रौप्य पटकावले़ यामध्ये ऋत्विक शिंदे, चिरायू ब्रह्मेचा, शंतनू पाटील, पार्थ सुतार यांचा सामावेश होता़ सायबर प्रकारात संघाने रौप्य पदक पटकावले. यामध्ये नितीश अग्रवाल, तनिष्क अष्टेकर, ध्रूव तोरणे, यशपाल खापरे यांचा सामावेश होता़
वैयक्तिक स्पर्धेत फॉईल प्रकारात ऋत्विक शिंदे याने कांस्य पदक मिळवले, तर ईपी प्रकारात सुवर्णपदक पटकावले़ पार्थ सुतारणे कांस्य पदक मिळवले़ सायबरमध्ये ध्रूव तोरणे, नितीश अग्रवाल यांनी कांस्य पदके मिळवली़ या संघाला प्रशिक्षक राजू शिंदे, ललित गांधी यांचे मार्गदर्शन लाभले़
फ ोटो क्रमांक -
फ ोटो ओळी - राज्य तलवारबाजी स्पर्धेत उपविजेता ठरलेला नाशिकचा संघ़ समवेत राज्य संघटनेचे सचिव डॉ़ उदय डोंगरे, प्रकाश पाटोळे, पांडुरंग रणमाळ, विशिम जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव आऱ आऱ पाटील आदि़