नाशिक : ‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी वाहने यामुळे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधीरपणाला निमंत्रण देणारा ठरत आहे. वाढते ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस आयुक्तालयानंतर प्रादेशिक परिवहन विभागानेही जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला सोमवारी परिवहन कार्यालयाच्या आवारातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन विभागाने उपस्थित टॅक्सीचालक, रिक्षाचालकांना ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा प्रचार-प्रसार करणा-या कॅप दिल्या. तसेच वाहनांच्या दर्शनी भागावर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ असे शाब्दिक आवाहन असलेले स्टिकर लावण्यात आले. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यासह आदि अधिकारी व टॅक्सी संघटना, वाहतूक संघटना, स्कूल बस चालक संघटना, रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:18 IST
यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.
नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश
ठळक मुद्दे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधीरपणाला निमंत्रण देणारा ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा शुभारंभ हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मीची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन