नाशिकरोड कारागृहात कैद्याची आत्महत्त्या चादरीच्या सहाय्याने गळफास : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
By Admin | Updated: April 7, 2015 01:44 IST2015-04-07T01:43:28+5:302015-04-07T01:44:02+5:30
नाशिकरोड कारागृहात कैद्याची आत्महत्त्या चादरीच्या सहाय्याने गळफास : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिकरोड कारागृहात कैद्याची आत्महत्त्या चादरीच्या सहाय्याने गळफास : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली़ आत्महत्त्या केलेल्या कैद्याचे नाव प्रल्हाद भगवंत रोकडे (वय २७, रा़ अवनखेड, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) असे असून, तो बलात्काराच्या गुन्'ातील आरोपी आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास कैदी प्रल्हाद रोकडे याने मंडल क्रमांक सातच्या सर्कल क्रमांक पाचमधील दोन नंबरच्या बॅरेकच्या शौचालयात जाऊन गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ यासाठी त्याने पांघरण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चादरीच्या पट्टीचा उपयोग केला़ पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ रोकडे हा गेल्या चार महिन्यांपासून न्यायालयीन कैदी म्हणून बंदी होता. दरम्यान, नाशिकरोड कारागृहात काही महिन्यांपूर्वी एका कैद्याने पाण्याच्या टाकीत आत्महत्त्या केल्याची घटना घडली होती़ सहा फुटाच्या टाकीत मृत्यू होऊ शकतो का? सदर टाकी वीस फूट उंचीवर असताना टाकीवर चढताना त्यास कुणी बघितले नाही का? या घटनेविषयी सहकैद्यांचे जबाब का घेण्यात आले नाही? शवविच्छेदनाच्या अहवालाचे काय झाले हे प्रश्न अजूनही कायम असताना पुन्हा एका कैद्याने आत्महत्त्या केल्याने या घटनेविषयी कारागृहात उलट-सुलट चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)