नाशिकरोड कारागृह प्रशासनाला फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 22:36 IST2016-06-10T22:35:53+5:302016-06-10T22:36:15+5:30

नाशिकरोड कारागृह प्रशासनाला फसविले

Nashik Road Jail administration is cheated | नाशिकरोड कारागृह प्रशासनाला फसविले

नाशिकरोड कारागृह प्रशासनाला फसविले

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात लोहार विभागासाठी लोखंडी अँगल्सचा पुरवठा करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदाकरिता केजीएन सेल्स या पुरवठादाराने बनावट कागदपत्रे सादर करून कारागृह प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तुरुंगाधिकारी विलास साबळे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मध्यवर्ती कारागृहात लोहार विभागासाठी लागणाऱ्या ४०/४०/०५ एमएमचे २०९५ किलो एसएस अ‍ॅँगलच्या पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या होत्या. के.जी.एन. सेल्सचा संचालक संशयित रईस जलाल शेख (रा. कलानगर जेलरोड नाशिकरोड) याने तांत्रिक कागदपत्रांमध्ये मारुती इंडस्ट्रीज अंबड यांच्याकडून सदर अ‍ॅँगल्सचा पुरवठा करण्याबाबत अधिकारपत्र दिले असल्याचे भासविले.
याबाबत कारागृह विभागाने खात्री केली असता मारुती सेल्सने पुरवठा करण्यासंदर्भात कोणतेही लेटरहेड दिलेले नाही. संशयित रईस शेख याने १ लाख ४६ हजार ६५ रुपयांचे २०९५ किलो लोखंडी अ‍ॅँगल्स मारुती इंडस्ट्रीज अंबड नाशिक या उत्पादकाचे बनावट अधिकारपत्र बनवून ते खरे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik Road Jail administration is cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.