शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या देवस्थान विकासात नाशिकरोडचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:29 IST

देशातील धार्मिक स्थळांना दरवर्षी लाखो भाविक रेल्वेने प्रवास करून भेटी देत असतात, त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळते. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नऊ विभागात महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या १५ रेल्वे स्थानकांचा विकास

ठळक मुद्देस्थानकाचे होणार आधुनिकीकरण : चार सदस्यीय समिती

लोकमत न्युज नेटवर्कनाशिकरोड : देशातील महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या ठिकाणाच्या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली असून, त्यासाठी देशातील १५ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात नाशिकचे धार्मिक महत्व लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या विभागातील नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.

देशातील धार्मिक स्थळांना दरवर्षी लाखो भाविक रेल्वेने प्रवास करून भेटी देत असतात, त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळते. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या नऊ विभागात महत्वाची धार्मिक स्थळे असलेल्या १५ रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील महत्त्वाची धार्मिक स्थळे असलेल्या चित्रकुटधाम, गुहावटी, कांचीपुरम, रामेश्वरम, श्रीसैलम, तिरुपती, व्दारका, उज्जैन, गया, पुरी, काशी, प्रयाग, हरिव्दार, ऋषीकेश व मध्य रेल्वे विभागातील एकमेव नाशिकरोड अशा रेल्वे स्थानकांचा त्यात समावेश आहे. याबाबत तातडीने सर्वे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. याकरिता नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे अधीक्षक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, वर्क्स विभागाचे वरिष्ठ अभियंता सुभाषचंद्र शर्मा, इलेक्ट्रिकल विभागाचे वरिष्ठ अभियंता प्रवीण पाटील या चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक हे धार्मिक स्थळ असून तसेच दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, त्याच बरोबर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे असल्याने याठिकाणीही बाराही महिने भाविक दर्शनासाठी येत असतात. याशिवाय नाशिकरोडहूनच शिर्डी दर्शनासाठीही भाविक रेल्वेने ये-जा करीत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विभागातील एकमेव नाशिक रोड रेल्वे स्थानकाची या आधुनिकीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिक