सीआयआयतर्फे ‘नाशिक राइज-नाशिक वोट’

By Admin | Updated: February 17, 2017 23:47 IST2017-02-17T23:47:23+5:302017-02-17T23:47:48+5:30

सीआयआयतर्फे ‘नाशिक राइज-नाशिक वोट’

'Nashik Rise-Nashik Vote' by CII | सीआयआयतर्फे ‘नाशिक राइज-नाशिक वोट’

सीआयआयतर्फे ‘नाशिक राइज-नाशिक वोट’

सातपूर : सीआयआयच्या वतीने सिम्बॉयसीस महाविद्यालयात ‘नाशिक राइज - नाशिक वोट’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादात संभाव्य मतदार मानसिकता आणि त्यांच्या मत निर्णयाचे निर्णायक योगदान यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत दि.२० फेब्रुवारी रोजी जास्तीत जास्त युवकांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जागरूकता करण्यात आली. याप्रसंगी सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे अध्यक्ष सुधीर मुतालिक, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, सीआयसीआयचे उपाध्यक्ष निनाद कर्पे, रोठे एर्डे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन कुमारसिंग, निवृत्त मेजर जनरल सायरस पिठावला, डॉ. वंदना सोनवणे आदिंनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. (वार्ताहर)
 

Web Title: 'Nashik Rise-Nashik Vote' by CII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.