शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनी राखले पर्यावरणाचे भान अन् जपले गोदामाईचे पावित्र्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 18:52 IST

जनप्रबोधनामुळे मागील काही वर्षांपासून चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. यावर्षी निर्माल्य संकलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला.

ठळक मुद्देसाधेपणामुळे गोदाप्रदूषणाला आळा निर्माल्य संकलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद गोदामाईचा श्वास कोंडला नाही

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश विसर्जन करताना नाशिककरांनी गोदामाईचे पावित्र्यही जोपासल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावर्षी गणेशभक्तांनी आपल्या मुर्ती दान करण्यावर अधिकाधिक भर दिल्याचे दिसून आले. महापालिका प्रशासनाने नदीकाठालगत तसेच जागोजागी उभारलेल्या कृत्रिम तलावात मुर्तींचे नाशिककरांनी विसर्जन केल्याने गोदामाईचा श्वास कोंडला नाही. जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले.प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेली व विविधप्रकारच्या रासायििनक रंगांचा वापर केलेल्या मुर्तींमुळे नदीचे प्रदूषण वाढीस लागून जलचर जैवविविधता धोक्यात सापडते. या जलप्रदूषणामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. पर्यावरणपुरक उत्सवाची संस्कृती रुजावी व ती वाढावी, याकरिता शहरात मागील दहा वर्षांपासून मनपा प्रशासनासोबत विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांकडून मुर्ती संकलन अभियान राबविले जात आहे. दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक नाशिककर आपल्या गणेशमुर्ती कृत्रीम तलावात विसर्जित केल्यानंतर त्या दान करतात. यामुळे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास काही प्रमाणात यश येते. यावर्षी कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर शासनाकडून मर्यादा आणल्या गेल्या होत्या. यामुळे विविध सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या गणेशमुर्तींची यंदा प्रतिष्ठापना केली गेली नव्हती. त्यामुळे मोठ्या मुर्ती नदीपात्रात विसर्जित झाल्या नाही.लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी आणताना प्रत्येक भाविक आपल्यासोबत निर्माल्याची पिशवी बाळगतो. श्रध्देपोटी निर्माल्यही यापुर्वी नदीपात्रात टाकले जात होते; मात्र जनप्रबोधनामुळे मागील काही वर्षांपासून चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. यावर्षी निर्माल्य संकलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला. महापालिका प्रशासनाच्या निर्माल्य संकलन रथातून हजारो टन निर्माल्य वाहून नेण्यात आले.

साधेपणामुळे गोदाप्रदूषणाला आळायंदा कोरोनामुळे गणेशोत्सव व विसर्जन अगदी साधेपणाने करण्यावर नाशिककरांनी भर दिला. यामुळे गोदाप्रदूषणाला आळा बसण्यास मदत झाली. गोदावरीसह तिच्या उपनद्या असलेल्या नंदिनी, वालदेवी, दारणा नद्यांचेही प्रदूषण नियंत्रणात राहिले. बहुतांश नागरिकांनी आपआपल्या इमारतीच्या आवारात कृत्रिम कुंड उभारुन सर्व रहिवाशांच्या बाप्पांचे विसर्जन करत मुर्ती मनपाकडे दान केल्या. यामुळे गोदाघाटावर मुर्ती विसर्जनाकरिता फारशी झुंबड उडाल्याचे दिसून आले नाही.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGaneshotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण