शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

नाशिककरांना उन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 01:25 IST

शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. 

ठळक मुद्देझळा तीव्र : पारा थेट ३९.१ अंशावर

नाशिक : शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. रविवारी दिवसभर प्रचंड कडक ऊन पडल्याने नाशिककर घामाघुम झाले होते. शहरासह उपनगरांमधील रस्तेही ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. मागील आठवड्यात शहराचे कमाल तापमान पस्तिशीच्या जवळपास तर किमान तापमान १७ ते १९ अंशापर्यंत स्थिरावत होते. मागील दोन दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नाशिककरांना उन्हाचा जोरदार चटका सहन करावा लागत आहे. तत्पूर्वी शहरात अवकाळी पावसाचे ढग दाटून येत होते तसेच हलक्या सरीही पहाटे व संध्याकाळी कोसळत होत्या. शनिवारी शहरात ३८.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर रविवारी यामध्ये पुन्हा वाढ  होऊन पारा ३९.१ अंशापर्यंत वर सरकला. दिवसभर प्रखर ऊन पडल्यामुळे नागिरकांना झळा असह्य झाल्या होत्या. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहरांमधील रस्ते सामसुम दिसून आले. यामुळे रविवारी कोरोना निर्बंधांचे पालन अधिकाधिक काटेकोरपणे होताना दिसून आले. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, आईस्क्रीम पार्लरमध्येही दिवसभर फारशी वर्दळ पाहावयास मिळाली नाही. कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने कोरोनाच्या निर्बंधांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली.यंदा कडक उन्हाळामागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहे. मार्च महिन्याचे अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असून बुधवारपर्यंत (दि. ३१) कमाल तापमानाचा पारा चाळिशीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. यापूर्वी २००४ साली १९ मार्च रोजी तसेच २०१९ साली २९ मार्च रोजी शहरात उच्चांकी ४०.४ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे.आरोग्याबाबत राहावे लागणार सतर्क उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने नाशिककरांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एकीकडे बदलते ऋतुमान अन् हवामानामुळे आरोग्यावर होणारा परिणाम तर दुसरीकडे पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच गडद झालेले कोरोनाचे संकट अशा दुहेरी धोक्याचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे. शरीरातील पाण्याची मात्रा टिकून ठेवण्यावर नागरिकांनी भर देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान