शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

नाशिक विभागात १५० टक्के विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:13 IST

नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.

ठळक मुद्देदुप्पट नोंद : तीस वर्षांतील सर्वाधिक; जिल्ह्यातील सर्वच धरणे फुल्ल; टंचाईचा प्रश्न मिटला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.विभागामध्ये दि. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १०१३.४ मिमी, धुळे- ५३०.५, नंदुरबार - ८३५.८, जळगाव- ६६३.३, अहमदनगर जिल्ह्यात- ४३६.४ मिमी असा एकूण ६५९.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा पावसाने कहरच केल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसानेदेखील चांगलाच जोर लावला आहे. दि. १ जून ते ३० सप्टेंबर पावसाळा ऋतूच्या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के), धुळे - ९५९ मिमी (१८०.८ टक्के), नंदुरबार- १३३६.८ मिमी. (१५९.९ टक्के), जळगाव- ७९५.७ मिमी (१२० टक्के), अहमदनगर- ५२९.५ मिमी (१२१.३ टक्के) पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.विभागातील पाचही जिल्ह्यांत १२५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी नाशिक विभागात ७५.७ टक्के पाऊस झाला होता. तालुकानिहाय पडलेला पाऊस नाशिक १२३२ मिमी (२०० टक्के), इगतपुरी- ५३०.४ मिमी (१५९ टक्के), दिंडोरी- १२१४ मिमी (१७४ टक्के), पेठ-३३४६ मिमी (१५२ टक्के), मालेगाव-६३५ मिमी (१४४ टक्के), नांदगाव-५३६ मिमी (११५ टक्के), चांदवड-६९२ मिमी (१३३ टक्के), कळवण-६८२ मिमी (१०३ टक्के), बागलाण-६६९ मिमी (१५९ टक्के), निफाड-५४१ मिमी (१२७ टक्के), सुरगाणा-२८४० मिमी (१६३ टक्के), सिन्नर-७५६ मिमी (१५४ टक्के), येवला- ७०९ मिमी (१६४ टक्के), त्र्यंबकेश्वर-३८६२ मिमी (१७६ टक्के), देवळा- ४९८ मिमी (८७ टक्के) असा एकूण नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के) पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.यंदा दुप्पट पाऊस झाल्याने पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. तर जमिनीत-देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास चांगलीच मदत झाली आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस