नाशिक-पुणे महामार्ग भूसंपादनाबाबत सोमवारी तोडगा?
By Admin | Updated: December 21, 2014 00:13 IST2014-12-21T00:13:23+5:302014-12-21T00:13:42+5:30
नाशिक-पुणे महामार्ग भूसंपादनाबाबत सोमवारी तोडगा?

नाशिक-पुणे महामार्ग भूसंपादनाबाबत सोमवारी तोडगा?
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी देण्यास सिन्नर येथील शेतकऱ्यांनी केलेला विरोध पाहता येत्या सोमवारी (दि. २२) त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जन सुनावणी घेण्यात येणार आहे.
नाशिक -पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यास नाशिाक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनीला योग्य मोबदला न दिल्याचे कारण देत जमीन भूसंपादनाच्या प्रक्रियेस विरोध करीत ही प्रक्रिया रोखली होती. यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला होता. तरीही त्यावर तोडगा निघत नसल्याने नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. आता पुन्हा जमीन भूसंपादनाबाबत तोडगा काढून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच ही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या उपस्थित जन सुनावणीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. सोमवारी या जमीन भूसंपादनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)