नाशिक - पुणे विमानसेवा बंद

By Admin | Updated: July 12, 2015 00:14 IST2015-07-12T00:08:42+5:302015-07-12T00:14:44+5:30

एचएएलची अडचण : मेहेरने केली उड्डाणे स्थगित

Nashik - Pune airport shut down | नाशिक - पुणे विमानसेवा बंद

नाशिक - पुणे विमानसेवा बंद

नाशिक : अवघ्या पाच दिवसांपूर्वी सुरू झालेली मेहेर या सी-प्लेन कंपनीची विमानसेवा बंद झाली आहे. एच.ए.एल.ने दुपारनंतर मनुष्यबळ पुरवण्यास नकार दिल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे, असे कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या श्रीनिवास एअरलाइनच्या सेवेकडे लक्ष लागून आहे.
नाशिकमधून हवाई सेवा सुरू करण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न झाले आणि गेल्यावर्षी ओझर विमानतळावर नागरी हवाईसेवेसाठी पॅसेंजर टर्मिनल उपलब्ध झाल्यानंतर हे प्रयत्न अधिक वेगाने सुरू झाले होते; परंतु ही सेवा सुरू होण्यासाठी कंपन्या केवळच सर्वे करीत होत्या. दरम्यान, वर्षभरापासून गंगापूर धरणावरून सी-प्लेन सुरू करण्यासाठी तयार असलेल्या मेहेर म्हणजेच मेरीटाइम एनर्जी हेलीएअर सर्व्हीसेस या कंपनीने ओझरच्या विमानतळावरून नाशिक-पुणे विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आणि त्यानुसार त्यांना सर्वप्रकारच्या शासकीय मान्यता मिळाली. त्यानुसार कंपनीने गेल्या सोमवारपासून (दि.१३) ही सेवा सुरू केली होती. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत ही सेवा सुरू करण्यात आली होती. कंपनीला चांगला प्रतिसादही लाभत होता, परंतु एचएएलच्या नियमाची आठकाठी निर्माण झाली आहे.
ओझर येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ दुपारी अडीच वाजता संपत असल्याने त्यांना अधिक काळ विमानतळावर नियुक्त करता येत नाही.

Web Title: Nashik - Pune airport shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.