नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील एरंडगाव येथे खड्डे बुजविण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 18:34 IST2019-12-04T18:05:48+5:302019-12-04T18:34:15+5:30
मानोरी : जळगाव नेऊर ते एरंडगाव रस्ता खड्डयात असल्याचे वृत्त लोकमत मध्ये गुरु वारी (दि.२१) प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागाने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या एरंडगाव येथे खडीकरण आणि डांबरीकरण करून डागडुजी करण्याचे काम मंगळवारी (दि.४) सुरू केले आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील एरंडगाव रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविताना.
मानोरी : जळगाव नेऊर ते एरंडगाव रस्ता खड्डयात असल्याचे वृत्त लोकमत मध्ये गुरु वारी (दि.२१) प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागाने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या एरंडगाव येथे खडीकरण आणि डांबरीकरण करून डागडुजी करण्याचे काम मंगळवारी (दि.४) सुरू केले आहे.
जळगाव नेउर ते एरंडगाव या तीन ते चार किलोमीटर अंतराच्या महामार्गाची मागील दोन वर्षांपासून दुरवस्था झाली असताना दोन चाकी आण िचार चाकी वाहन चालक, प्रवासी या रस्त्यांना पुरते वैतागले होते. एरंडगाव मध्ये खड्डे बुजविण्यास सुरु वात केल्यानंतर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
एरंडगाव नजीक असलेल्या आंबाचारी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यात खड्यांची व्याप्ती इतकी वाढली होती की, खड्डे वाचविण्याच्या नादात अपघात घडत होते.
वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड होत होते. नटबोल्ट देखील वाहनांचे गळून पडत असल्याने अनेक वाहने नादुरुस्त होण्याचे देखील प्रमाण वाढत होते. तरी संबंधित विभागाने एरंडगाव ते जळगाव नेउर या सरसकट रस्त्याचे खडकीकरण करून डांबराने डागडुजी करणे गरजेचे असून वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी लोकमतचे आभार मानले.