नाशिकमध्ये डाळींब दहा रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:18 IST2020-08-08T22:43:19+5:302020-08-09T00:18:34+5:30
पंचवटी : गेल्या आठवड्यापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवरील फळबाजारात डाळींब मालाची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यांत डाळिंबाची मागणीदेखील घट झाल्याने बाजारभाव दहा रुपये किलोवर आले आहेत. बाजार समितीत नगर, संगमनेर या भागांतून दैनंदिन डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत डाळींब आवक वाढली खरी मात्र परराज्यांत आणि परजिल्ह्यांत डाळींब माल रवाना केला जात नसल्याने बाजारभाव कोसळले आहेत.

नाशिकमध्ये डाळींब दहा रुपये किलो
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : गेल्या आठवड्यापासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोडवरील फळबाजारात डाळींब मालाची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यांत डाळिंबाची मागणीदेखील घट झाल्याने बाजारभाव दहा रुपये किलोवर आले आहेत. बाजार समितीत नगर, संगमनेर या भागांतून दैनंदिन डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत डाळींब आवक वाढली खरी मात्र परराज्यांत आणि परजिल्ह्यांत डाळींब माल रवाना केला जात नसल्याने बाजारभाव कोसळले आहेत.
लॉकडाऊनमुळे परराज्यांत माल कमी प्रमाणात जात आहे. डाळींब आवक वाढल्यानंतर बाजारपेठेत मागणी नसल्याने बाजार घसरले आहे. फळबाजारात डाळींब १० ते ५० रु पये किलो दराने विक्री होत आहे, तर चांगल्या मालालादेखील उठाव नसल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकनुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळणाºया डाळींबा मालाला २० ते ४० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने डाळींब विक्र ी करावी लागत आहे.बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून डाळींब आवक वाढली आहे. संगमनेर, नगर येथील शेतकरी डाळींब विक्र ीसाठी आणतात. मात्र डाळींब मालाला उठाव नाही, त्यातच कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने अनेक भागांत लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे त्या भागात डाळींब जात नाही म्हणून बाजार घसरलेले आहेत. - सुभाष अग्रहरी, डाळींब व्यापारी, नाशिक