शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१५किलो चांदी, ३५ तोळे सोने घेऊन वर्षभरापुर्वी पोबारा करणार्‍या कार चालकाच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:35 IST

गुन्ह्याच्या तपासाचा ‘टास्क’ सरकारवाडा पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव व त्यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून यादव यास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा या मुळ गावातून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देचोरी केलेले १००ग्रॅमचे तीन व ५०ग्रॅमचे चार सोन्याची बिस्कीटे तसेच पंधरा किलो चांदी हस्तगत वर्षभरापुर्वी मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा केल्याची घटना

नाशिक : कारसाठी चालक म्हणून एका युवकाला नोकरीला ठेवणे गोविंदनगरमधील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. सदर चालकाने विश्वास संपादन करुन वर्षभरापुर्वी मालकाच्या घरातून ३५ तोळे सोने व १५ किलो चांदी घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्याची फिर्याद बुधवारी (दि.८) मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयित चालकाच्या मुसक्या काही तासांमध्ये आवळून त्याच्याकडून सोने-चांदीही हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, येथील गोविंदनगर परिसरातील एका बंगल्यात घरफोडीमध्ये सुमारे चौदा लाखांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणार्‍या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या गोविंदनगरमधील समीरा सोसायटीच्या एक क्रमांकाच्या सदनिकेतून सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित कारचालक नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद चांडक यांनी मुंबईनाका पोलीस बुधवारी दिली.

पोलिसांनी उशिरा फिर्याद दाखल होण्यामागील कारण स्पष्ट केले नाही. वालझाडे हा अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर असून तो पदव्युत्तर शिक्षणही घेत होता. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील व सहायक आयुक्त राजू भुजबळ यांनी या गुन्ह्याच्या तपासाचा ‘टास्क’ सरकारवाडा पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक सारिका अहिरराव व त्यांच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरवून यादव यास सटाणा तालुक्यातील ठेंगोडा या मुळ गावातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता वालझाडे याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले १००ग्रॅमचे तीन व ५०ग्रॅमचे चार सोन्याची बिस्कीटे तसेच पंधरा किलो चांदी संशयित वालझाडेक डून पोलिसांनी हस्तगत केला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीGoldसोनं