शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा पोलीस अंगणात येऊन म्हणतात, 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 10:11 IST

घरातच विवाह आटोपलेल्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस पोहोचले; नवविवाहितेच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू

-अझहर शेखनाशिक: सर्वत्र लॉकडाऊन अन संचारबंदी जमावबंदी आदेश लागू... अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून होते कारवाई... अशातच भर दुपारी नाशिकच्या अशोकामार्ग परिसरात एका अपार्टमेंटखाली पोलिसांचा ताफा सायरन वाजवीत दाखल होतो अन रहिवाशांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. मात्र हा पोलीस ताफा कोणावर कारवाई करण्यासाठी नव्हे तर चक्क एका नववधू-वराला विवाहच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेला असतो. क्षणार्धात पोलीस वाहनाच्या ध्वनिक्षेपकावरून 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी...' या गीत ऐकू येऊ लागतात अन मग काय सगळे रहिवाशी आपापल्या खिडकी, बाल्कनीत येऊन पोलिसांच्या या आगळ्या उपक्रमाला टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद देतात.

अशोकामार्गावरील श्री गणेशबाबा समाधी मंदिरासमोरील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जोशी कुटुंबातील हरिणी नामक युवतीचा पूर्वनियोजित विवाह ठरलेला. लॉकडाऊन काळात हा विवाह अगदी साधेपणाने घरच्या घरी कुठल्याही प्रकारचा उत्सवी स्वरूप न देता आटोपण्याचा निर्णय वधू-वर पक्षाकडून घेतला गेला. नवरदेव थेट गुजरातवरून आपल्या बसत्यासह गुजरात सरकारच्या परवानगीने एकटाच बोहल्यावर चढण्यासाठी नववधूच्या घरी पोहचला. पारंपरिक वैदिक पद्धतीने घरातच हरिणी आणि निकुंज यांनी सात फेरे पूर्ण केले. 24 तास देशाची अन राज्याची आरोग्ययंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर झटत आहे, आणि त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन अगदी खांद्याला खांदा लावून परिश्रम घेत आहेत. 'कोरोनाला हारावयचं मग, आपण घरातच थांबा' असे कळकळीचे आवाहन सर्व स्तरातून नागरिकांना केले जात आहे. त्यामुळे कोरोना अन गर्दीचे घातक समीकरण आपण आपल्या रेशीमगाठी बांधतानासुध्दा जुळून येऊ देणार नाही असा चंग हरिणी आणि निकुंज या दोघांनी बांधला. निकुंजच्या कुटुंबाने आपल्या लाडक्याचा विवाहसोहळा चक्क व्हिडिओ कॉलवरून अनुभवला आणि दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले.अगदी साधेपणाने आटोपशीर झालेल्या या विवाहाची वार्ता नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना समजली तेव्हा त्यांनी एका सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास  नवदाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देऊन या, असे सुचविले. पोलीस अधिकारी,  कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन ते नववधू च्या अंगणात दाखल झाले. पोलीस वाहनांचा सायरन कानी येताच परिसरात निरव शांतता पसरली. नखाते यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे हरिणी आणि निकुंज यांना बाल्कनीत बोलावून 'तुम्ही अगदी साधेपणाने विवाह आटोपून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले, आणि सामाजपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला, म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत' असे सांगितले अन सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

हरिणीच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रूजेव्हा पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे मोबाईलमधील 'तेरे माथे की बिंदीया चमकती रहे, तेरे हाथो की महेंदी महेकती रहे, तेरे जोडे की रौनक सलामत रहे, 'तेरी चुडी हमेशा खनकती रहे....., मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी....' हे गीत सुरू करताच हरिणीच्या डोळ्यांत पुन्हा आनंदाश्रू आले, आणि निकुंजने तिला सावरताच या दोघांनी टाळ्यांच्या कडकडाटात बाल्कनीत उभे राहून खाली आलेल्या पोलिसांचे मनापासून आभार मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न