नाशिकमध्ये एकावर गोळीबार, 4 संशयित ताब्यात

By Admin | Updated: July 8, 2017 15:47 IST2017-07-08T15:46:58+5:302017-07-08T15:47:34+5:30

नाशिकमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

In Nashik, one person was fired, 4 suspects arrested | नाशिकमध्ये एकावर गोळीबार, 4 संशयित ताब्यात

नाशिकमध्ये एकावर गोळीबार, 4 संशयित ताब्यात

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8-  नाशिकमध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. फिगो मोटारीतून (एम एच 15. डी सी 2537 ) जाणारे शिवमीलन रामराज सिंग (४२) यांचा मोटारींद्वारे पाच ते सहा जणांनी पथर्डीफाटा येथून पाठलाग सुरु केला. 
वडनेर रस्त्यावर त्यांच्या मोटारीला या हल्लेखोरांनी घेरले. मोटारीतून खाली उतरत हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्या कानशिळेवर पिस्तुल लावले. सिंग यांनी बचावासाठी त्या हल्लेखोरांच्या हाताला हिसका दिला यावेळी त्याने गोळीबार केला. 
 
सिंग यांच्या डाव्या हाताला गोळी लागली असून ते जखमी झाले आहे. गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांनी पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा सुरू केला आणि हल्लेखोरांच्या मागावर पथक रवाना करत नियंत्रन कक्षातून सतर्क कॉल दिला गेला. 
 
चार संशयित हल्लेखोर पोलिसांना सापडले आहे. सिंग यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळावरून एक जिवंत काडतुस, गोळीची पुंगली जप्त केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लांडे करीत आहे.

Web Title: In Nashik, one person was fired, 4 suspects arrested