शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

राज्यात ७.९ नीचांकी तापमान : नाशिककरांना पुन्हा भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:16 IST

१७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला.

ठळक मुद्देगुरूवारी थेट ७.९ अंश इतकी नोंद महाबळेश्वर- किमान तापमान ११.८ अंशथंडीपासून बचावसाठी पहाटे शेकोट्या पेटविल्या

नाशिक : शहराच्या किमान तापमानाचा पारा गुरूवारी (दि.३०) अचानकपणे ७.९ अंशापर्यंत घसरला. त्यामुळे पुन्हा राज्यात सर्वाधिक नीचांकी नोंद नाशिकमध्ये झाली. बुधवारी संध्याकाळपासूनच शहरात थंड वारे वेगाने वाहण्यास सुरूवात झाल्यामुळे गुरूवारी पहाटे थंडीचा तीव्र कडाका नाशिककरांना अनुभवयास आला. त्यामुळे सकाळी रस्त्यांवरील वर्दळदेखील थंडावल्याचे चित्र होते. अचानकपणे थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.पंधरवड्यापासून शहराचे तापमान १२ ते १५ अंशाच्या जवळपास स्थिरावत असल्यामुळे नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळालेला होता. तत्पुर्वी १७ तारखेला तापमानाचा पारा थेट ६ अंशापर्यंत खाली घसरल्याने या हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली. त्या तीन दिवसांत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. निफाडमध्ये तेव्हा २अंशापर्यंत तापमान खाली घसरले होते. १७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला. गुरूवारी थेट ७.९ अंश इतकी नोंद झाल्याने शुक्रवारी पुन्हा तापमानाचा पारा यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण दिवसभर थंड वारे वाहत होते. सुर्यास्तानंतर थंड वाऱ्याचा वेग अधिक वाढला होता. दहा दिवसांपासून नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळालेला होता, त्यामुळे थंडी परतू लागल्याची चर्चाही कर्णोपकर्णी होऊ लागली असताना अचानकपणे लहरी निसर्गाने पुन्हा कमाल दाखविल्याने किमान तापमानाचा पारा अचानक खाली कोसळला.गुरूवारी पहाटेपासून थंडी वाढल्याने सकाळी रस्ते, जॉगिंग ट्रॅकचा परिसर बºयापैकी रिकामा झाल्याचे चित्र होते. सकाळी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाताना विद्यार्थ्यांनी ऊबदार कपड्यांनी डोक्यापासून पायापर्र्र्यंत स्वत:ला ‘पॅक’ करून घेतले होते. दूध, वर्तमानपत्र, भाजीपाला विक्रेत्यांनीही सकाळचा आपला व्यवसाय सांभाळताना थंडीपासून संरक्षणाचा पुरेपुर उपाय केल्याचे दिसून आले. तसेच गोदाकाठावर उघड्यावर राहणा-या मोलमूजरी करणा-या भटक्यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी पहाटे शेकोट्या पेटविल्या होत्या. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्यामुळे डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.आठवडाभरातील नाशिकचे किमान तापमान असे...गुरूवारी (दि.२३) - १५शुक्रवारी (दि.२४) - १४.९शनिवारी (दि.२५)- १४.४रविवारी (दि.२६) - १४.१सोमवारी (दि.२७)- १५मंगळवारी (दि.२८)- १४.५बुधवारी (दि.२९) १३.९गुरूवारी (दि.३०) ७.९प्रमुख शहरांचे आजचे किमान तापमानमहाबळेश्वर - ११.८अहमदनगर - ९.७जळगाव - ८.५मालेगाव - १०पुणे - ११नाशिक- ७.९ (निफाड-६)सातारा - १२नागपूर - १२.२ 

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान