शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेचे होम कोरंटाईन स्टीकर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 17:42 IST

नाशिक : विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सजग नागरिकांमुळे महापालिकेला सहजगत्या गायब होणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळत असून, त्या आधारे आत्तापर्यंत सुमारे तीस नागरिकांना प्रशासनाने शोधून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देनागरीक सजगगायब होणारे तीस जण ताब्यात

नाशिक : विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सजग नागरिकांमुळे महापालिकेला सहजगत्या गायब होणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळत असून, त्या आधारे आत्तापर्यंत सुमारे तीस नागरिकांना प्रशासनाने शोधून ताब्यात घेतले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विदेशातून प्रवास करून आलेल्यांबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. विशेषत: केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाग्रस्त देशांची यादी तयार केली असून, या देशातून जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जाते. तसेच त्यांना घरातच निगराणीखाली ठेवले जाते. चौदा दिवस त्यांना अशाप्रकारे देखरेखीखाली ठेवताना त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आहे किंवा नाही याची तत्काळ माहिती मिळते. विशेषत: चीन, इटली, जर्मनी यांसारख्या देशांतून १५ मार्चनंतर प्रवास करून आलेल्यांची विशेष दक्षता घेतली जाते आणि त्यांची तपासणी केली जाते. परंतु त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी घरातच राहणे आवश्यक असतानादेखील अनेक जण कामाचे निमित्त करून घराबाहेर पडतात. त्यांना संसर्ग असेल तर तो समाजासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने अखेरीस त्यांचा शोध घेऊन पकडावे लागते.

महापालिकेने त्यावर पर्याय शोधला असून, संबंधित सोसायटी किंवा बंगल्यावर हे घर कोरंटाईनमध्ये आहे असे स्टिकर लावले जात आहे. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक सतर्क होतात आणि समजा त्या घरातील व्यक्ती विशेषत: विदेशातून आलेला सदस्य घराबाहेर पडलाच तर कोणी ना कोणी सजग नागरिक महापालिकेला तत्काळ कळवतात. त्यामुळे महापालिकेला संंबंधितांचा शोध घेणे सोपे जाते.महापालिकेने अशा प्रकारे तीनशे घरांवर स्टिकर्स लावले असून त्यामुळे आत्तापर्यंत तीस जणांना पुन्हा शोधण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकत नसतील तर अशा नागरिकांची मात्र थेट तपोवनातील विशेष विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका