शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:24 IST

प्रकल्पाला खासदार निधी : नववर्षात संकल्पना राबविण्याची शिक्षण विभागाची तयारी

ठळक मुद्देडिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाहीक्लासरूमचे केंद्र मनपाच्या शाळा क्रमांक ६ मध्ये असणार आहे

नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली आहे.डिजिटल युगाचा स्वीकार करण्यात महापालिका शाळाही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून मनपा शिक्षण विभागाला ६ व्हर्च्यूअल क्लासरूम मंजूर झाल्या आहेत. या क्लासरूमचे केंद्र मनपाच्या शाळा क्रमांक ६ मध्ये असणार आहे. शिक्षण विभागाने सहाही विभागातील एका शाळेची त्यासाठी निवड केली आहे. शाळा क्रमांक १६ मधून प्रक्षेपण संबंधित शाळांमध्ये केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, शैक्षणिक लघुपट, अभ्यासाला पूरक फिल्मस् यांचा समावेश असणार आहे. संबंधित शाळांमध्ये आसपासच्या पालिका शाळांमधील विद्यार्थी निवडून त्यांचे गट करून त्यांना व्हर्च्यूअल क्लासरूमशी कनेक्ट केले जाणार आहेत. ज्या शाळांमध्ये नववी-दहावीचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठीही उपयुक्त अशा कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. सर्व उपक्रमांचे रेकॉर्डिंग करून ठेवत त्यांचा उपयोग अन्य शाळांसाठी करण्याचा मनोदयही उपासनी यांनी व्यक्त केला. या क्लासरूमच्या माध्यमातून त्या-त्या शाळांमधील शिक्षकांचे उद्बोधन होणार आहे.या शाळांमध्ये साकारणार व्हर्च्यूअल क्लासरूमपंचवटी विभागातील म्हसरूळ येथील शाळा क्रमांक ८९, नाशिकरोड विभागात पंचक येथील शाळा क्रमांक ३६, नाशिक पूर्व विभागात टाकळी येथील शाळा क्रमांक ४७, गंगापूररोडवरील आनंदवली येथील शाळा क्रमांक ७१, सातपूर विभागात विश्वासनगर येथील शाळा क्रमांक २२ आणि सिडको विभागात अंबड येथील शाळा क्रमांक ७२ याठिकाणी व्हर्च्यूअल क्लासरूम साकारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाeducationशैक्षणिक