शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:35 IST

नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने ...

ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : येत्या पाच वर्षात नाशकात लाकडांविना होणार अंत्यसंस्कार

नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे. २०५० पर्यंत कार्बनमुक्त शहर करण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता महापालिका त्या दृष्टीने काम करणार असून, येत्या काही वर्षात अंत्यसंस्कारासाठी होत असलेला लाकडांचा वापर पूर्णत: थांबविण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेने टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी काही उद्दिष्ट निश्चित केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिली.पर्यावरणीय दृष्टिकोनातून नाशिक हे अत्यंत उत्तम शहर आहे. त्याची हीच ओळख राहावी यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी या उपक्रमाचे उद्दिष्टदेखील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शाश्वत विकास असाच आहे. त्यात आता नाशिक महापालिकेने युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये सहभाग घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनाचे महासंकट असतानाच यासंदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दहा ते पन्नास लाख लोकसंख्येच्या दुसऱ्या स्तरातील शहरांमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे.या मोहिमेंतर्गत २०५० पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्बन उत्सर्जन संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट आहे. काही उद्दिष्टे महापालिकेने ठरवायची असून, काही युनोच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.महापालिकेने येत्या तीन ते पाच वर्षांची काही उद्दिष्ट ठरवली आहेत. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर पूर्णत: थांबवून त्याऐवजी विद्युत तसेच गॅसदाहिनीचा वापर शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरात झाडे लावून ऑक्सिजन हब तयार करणे असे विविध उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार आहे. युनोच्या माध्यमातून झिरो कार्बन करण्यासाठी काय करता येईल याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. ‘माझी वसुंधरा’मध्ये नाशिक सर्वोत्तमशासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने भरीव कामगिरी केली असून, त्यामुळे शनिवारी (दि. ५) राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सोहळ्यात आयुक्त कैलास जाधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोरोनाकाळातदेखील महापालिकेने पर्यावरणविषयक कामे सुरूच ठेवली. धुलिकरण रोखण्यासाठी खडीच्या रस्त्यावर पाण्याचा वापर, नदीचे संवर्धन, नदीपात्रातील गाळ काढणे, उद्यानातील वृक्ष संवर्धन अशा विविध कारणांमुळे महापालिकेला हा बहुमान मिळाला आहे.  

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण