शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

नाशिक महापालिका आयुक्तांकडून नवीन आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टीत दरवाढ होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:46 PM

लवकरच स्थायीला होणार सादर : १४७५ कोटी रुपयांपर्यंत अंदाजपत्रक जाण्याचे संकेत

ठळक मुद्दे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक १४५१ कोटी रुपयांवर गेल्याने यंदा पहिल्यांदाच उत्पन्नात ४१ कोटी रुपयांनी वाढ येत्या आठ दिवसांत कधीही सदर अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाण्याची शक्यता आहे

नाशिक - महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडून लवकरच स्थायी समितीला सादर होणार असून अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ सुचविण्यात आलेली आहे. नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक १४७५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक १४५१ कोटी रुपयांवर गेल्याने यंदा पहिल्यांदाच उत्पन्नात ४१ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे.महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक लेखा विभागाकडून तयार झाले असून त्यावर आयुक्तांची स्वाक्षरीही झालेली आहे. येत्या आठ दिवसांत कधीही सदर अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मागील वर्षाप्रमाणेच घरपट्टीमध्ये एकूण १४ टक्के तर पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. या दरवाढीतून महापालिकेला सुमारे १२ ते १५ कोटी रुपये वाढीव उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. महापालिकेमार्फत शहरातील मिळकतींचा सर्वे सुरू आहे. या सर्वेक्षणात सुमारे ५७ हजार नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. या मिळकतींच्या कररचनेतही सुधारणा करण्यात आली असून त्यामाध्यमातूनही महापालिकेला सुमारे १२ ते १४ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांचे अंदाजपत्रक १४७५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याचे संकेत मिळत आहेत. आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यंदा त्यात सुमारे ६५ कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे. विविध योजनांसाठी जाणारा मनपाचा हिस्सा पाहता यंदाही भांडवली कामांसाठी फार मोठा उपलब्ध होणार नसल्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे. यापूर्वी हाती घेतलेली कामेच पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प अंदाजपत्रकात असून नवीन कामांना फारशी संधी नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न १२२८.९२ दर्शविले होते तर स्पीलओव्हर ६०७.७२ कोटी रुपये नमूद करण्यात आला होता. मात्र, नवीन आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्पीलओव्हर ४५० कोटी रुपयांपर्यंत खाली येण्याचा विश्वासही आयुक्तांनी बोलून दाखविला आहे.उत्पन्नात ४१ कोटींनी वाढआयुक्तांकडून नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करतानाच स्थायी समितीसमोर सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकही सादर केले जाणार आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. सुधारित अंदाजपत्रक १४५१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महापालिकेच्या उत्पन्नात ४१ कोटींनी वाढ झालेली आहे. महापालिकेमार्फत सुरू असलेले मिळकतींचे सर्वेक्षण यामुळे उत्पन्नात वाढ दिसत असून नगररचना विभागामार्फत ९ मीटरवरील रस्त्यांलगतच्या बांधकामांना परवानगी देण्याचे धोरण राबविले जात असल्याने त्यातूनही सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांची वाढ दिसून येत आहे. याशिवाय, सेवासुविधांच्या माध्यमातून उत्पन्न ९५.२६ कोटींवर जाऊन पोहोचले आहे. महापालिकेने सेवासुविधांपासून ३७.९२ कोटी रुपये उद्दिष्ट समोर ठेवले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प