शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेचे यंदाही मिशन विघ्नहर्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 17:48 IST

नाशिक : कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे.

ठळक मुद्देपर्यावरणस्नेही उत्सवगर्दी टाळण्यासाठी ॲपचा उपयोग

नाशिक: कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे.

नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी  याबाबत माहिती दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नसल्याने गणेशोत्सव मंडळे हिरमुसली होती. अर्थात, त्यावेळी कोरोनाची तीव्रता भयंकर असल्याने राज्य शासनाने निर्बंध घातले होतेच, शिवाय नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेदेखील अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदा मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने आणि राज्य शासनाने निर्बंधही घटविल्याने आता मंडळांमध्ये उत्साह आहे. मात्र, शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाही मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

राज्य शासनाने गणेशोत्सवासंदर्भात नियमावली घालून दिली आहे त्यानुसार मंडप आणि मूर्तीची उंची निश्चित आहे. मात्र, त्याच बरोबर उत्सव साजरा करताना पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यावर महापालिका भर देणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरणपूरक सजावटी करण्यावर भर देण्यास सांगण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी विसर्जनच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी घरीच विर्सजन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येेणार आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचेदेखील वितरण करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

महापालिकेने गेल्या वर्षी गर्दी टाळण्यासाठी नदीकाठी विसर्जनस्थळी जाणाऱ्या मिरवणुका तसेच गणेश भक्तांसाठी टाईम स्लॉट बुकिंगसाठी ॲप तयार करण्यात आले होते. तसेच ॲप यंदा वापरण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव