शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नाशिकचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंपुढे उत्पन्नवाढीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:00 IST

कसोटीचा काळ : मूलभूत सोयीसुविधांबाबत जनतेच्या अपेक्षा

ठळक मुद्देसप्ताहात महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता असून, त्यात पुरवणी यादीत ‘मुंढे पॅटर्न’कडे लक्षमुंढे यांना अपु-या मनुष्यबळावर उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : कोठेही आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे आणि बारा वर्षांत दहा वेळा बदली झालेले तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्याने त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या प्रसिद्धीवलयामुळे नाशिककरांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्याचा विडा आयुक्तांनी पहिल्या दिवसापासूनच उचलला असला तरी महापालिकेची बिघडलेली आर्थिक घडी बसविण्याचे मोठे आव्हान मुंढे यांच्यासमोर आहे. या सप्ताहात महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर होण्याची शक्यता असून, त्यात पुरवणी यादीत ‘मुंढे पॅटर्न’कडे लक्ष लागून असणार आहे.तुकाराम मुंढे यांची आजवरची कारकीर्द गाजलेली आहे. सत्ताधा-यांविरुद्ध संघर्षामुळे त्यांचा कुठेही टिकाव लागू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना बारा वर्षांत दहा वेळा बदलीची बक्षिसी मिळालेली आहे. मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नियुक्ती केली असल्याने मुंढे यांच्याकडून सत्ताधारी भाजपाबरोबरच नाशिककरांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. महापालिकेचे उत्पन्न साधारणत: ११०० ते १२०० कोटी रुपयांपर्यंत आहे मात्र, दायित्व त्याहून अधिक आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केलेले असून, ते १४७५ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कृष्ण यांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. आता तेच सुधारित अंदाजपत्रक १४५१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. कृष्ण यांनी आपल्या कारकिर्दीत उत्पन्न वाढीसाठी घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीच्या वसुलीवर मोठा भर दिला होता. याशिवाय, नगररचना विभागातही सुसूत्रता आणल्याने विकास शुल्काच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नातही वाढ झालेली होती. मात्र, दिवसेंदिवस महापालिकेला उत्पन्न कमी आणि दायित्व जास्त याचा सामना करावा लागतो आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी मनपाचा देण्यात येणारा हिस्सा, स्मार्ट सिटीचा हिस्सा यामुळे भांडवली कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यातच येत्या अंदाजपत्रकात शहर बससेवा ताब्यात घेण्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंढे यांना अपु-या मनुष्यबळावर उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. महापालिकेचे जाहिरात धोरण शासनाकडे मान्यतेसाठी पडून आहे. याशिवाय, विकास नियंत्रण नियमावलीनुसार ६ आणि ७.५० मीटरच्या रस्त्यावरील बांधकाम परवानगीचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळेही उत्पन्नाचा गाडा अडलेला आहे.घरपट्टी-पाणीपट्टी वाढीचे संकेतमावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आपल्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीची सूचना केलेली आहे. त्यामुळे महासभेतही आयुक्तांकडून करवाढीचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. आता मुंढे यांनी केवळ मुख्यमंत्र्यांचाच अजेंडा राबविण्याचे ठरविले असल्याने महासभेतही घरपट्टी-पाणीपट्टी दरवाढीला सत्ताधारी भाजपाकडून मंजुरी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे