शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कोरोना संदर्भात नाशिक मनपा करणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:20 IST

नाशिक : चीनमधून पसरलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातही दक्षता घेण्यात येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र (विलगीकरण) कक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष  अद्याप एकही रुग्ण नाही

नाशिक: चीनमधून पसरलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरातही दक्षता घेण्यात येत असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र (विलगीकरण) कक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भात प्रबोधन करण्यात येणार आहे.

स्थायी समितीच्या गुरुवारी (दि.७) झालेल्या बैठकीत यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी ही माहिती दिली. कोरोना संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे. नाशिक शहर किंवा जिल्ह्यात अद्याप यासंदर्भात कोणताही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, तरीही जिल्हा शासकीय रुग्णालयात यासंदर्भात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

रोगाची लक्षणे आणि अन्य माहिती देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विद्यमाने वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली असून, त्यांनाही दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. संशयित रुग्ण आढळलाच तर त्याचा स्वॅप घेतल्यानंतर तो मुंबई येथे चाचणीसाठी पाठविण्यात येईल आणि तेथील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित रुग्णावर त्यादृष्टीने उपचार करण्यात येतील, असेही रावते यांनी सांगितले. यासंदर्भात समीर कांबळे, अशोक मुर्तडक तसेच अन्य सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला डॉ. रावते यांनी उत्तरे दिली. अनेक नागरिकांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार नोकरी-व्यवसाय किंवा अन्य कारणाने कोणी चीनमध्ये गेले असतील तर त्यादृष्टीनेदेखील काळजी घेतली पाहिजे, असेही यावेळी सभापती उद्धव निमसे यांनी सांगितले.इन्फो...ही आहेत रोगाची लक्षणे...घसा खवखवणे, सर्दी पडसे आणि अति ताप करणे आणि निमोनिया होणे या स्वरूपाची लक्षणे असतात. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास काळजी घेऊन तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यcorona virusकोरोना