शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या वतीने बेल महोत्सव साजरा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:10 IST

नाशिक- पर्यावरण जागृती करतानाच लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वनराई प्रकल्पाबरोबरच आता बेलाच्या झाडाचे महत्व वाढावे यासाठी बेलोत्सव साजरा करण्यात येणार असून तसा मनोदय नाशिक महापालिकेच्या देवराई प्रकल्पाचे सदिच्छादुत सयाजी पवार यांनी व्यक्त केली आणि महापालिकेने देखील त्यास दुजोरा दिला आहे, याशिवाय महापालिकेच्या वतीने मुल जन्माचा शुभप्रसंगी, वधु आगमनापासून दिवगंत व्यक्तीच्या नावाने वृक्ष लावण्याच्या स्मृतीवनापर्यंत विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने पर्यावरणाच्या निमित्ताने देण्यात आली.

ठळक मुद्देबेलाचे पान वाहाण्यापेक्षा बेलाच्या झाडाचे संवर्धन कराश्रावणात बेल झाडाचे महत्व वाढवणारशालेय विद्यार्थ्यांत जागृती करणार

नाशिक- पर्यावरण जागृती करतानाच लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वनराई प्रकल्पाबरोबरच आता बेलाच्या झाडाचे महत्व वाढावे यासाठी बेलोत्सव साजरा करण्यात येणार असून तसा मनोदय नाशिक महापालिकेच्या देवराई प्रकल्पाचे सदिच्छादुत सयाजी पवार यांनी व्यक्त केली आणि महापालिकेने देखील त्यास दुजोरा दिला आहे, याशिवाय महापालिकेच्या वतीने मुल जन्माचा शुभप्रसंगी, वधु आगमनापासून दिवगंत व्यक्तीच्या नावाने वृक्ष लावण्याच्या स्मृतीवनापर्यंत विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने पर्यावरणाच्या निमित्ताने देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात सहा विभागात देवराई प्रकल्प राबविण्यात आले आहेत. त्यासाठी सह्याद्री देवराईकार अभिनेते सयाजी पवार यांनी मोफत मार्गदर्शन केले असून त्यानंतरही त्यांनी अशाच प्रकारे महापालिकेला सहाय्य करण्याचे ठरविले. त्यामुळे महापालिकेने त्यांना सदिच्छादुत म्हणजेच ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर नियुक्त केले असून पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते आनंदवल्ली तसेच जुन्या नाशकात देवराई प्रकल्पांचे उदघाटन करण्यात आले.

नाशिक महापालिकेने पर्यावरर दिनाच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार काही निर्णय घेतले आहेत. त्याची माहिती शिंदे व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत दिली. साताऱ्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या वतीने श्रावणात बेलोत्सव घेतला जाईल. त्यात शाळकरी मुलांचा देखील सहभाग वाढविण्यात येईल. बेलाची पाने भगवान शंकराला वाहिली जात असली तरी काही वेळानंतर ते निर्माल्य बनते. त्यामुळे झाडालाच देव म्हणून त्याचे संवर्धन करा अशाप्रकारचा महोत्सव असणार आहे. याशिवाय वृक्षरोपणासाठी अन्य योजना देखील राबविण्यात येणार आहेत. त्यात मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या जन्मराशीच्या नक्षत्राचे झाडे संबंधीत हॉस्पीटल कडून मुलांना देण्याचे नियोेजन आहे. मुलाचा विवाह झाल्यानंतर घरात सुन आल्याने तसेच मुलीचा विवाह झाल्यानंतर तीची आठवण म्हणून देखील वृक्ष लाववा असे आवाहन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दिवगंत व्यक्तीच्या स्मृती टिकवण्यासाठी देखील वृक्ष लागवड करायची झाल्यास प्रशासन सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentवातावरण