शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भुसंपादनाचा मोबदला देण्यावरून नाशिक महापालिकेत घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 15:46 IST

नाशिक- महापालिकेत सध्या १५७ कोटी रूपयांच्या भूसंपादनाचा प्रश्न गाजत असून महासभेने स्थायी समितीवर प्राधान्य धोरणानुसार कोणताही निर्णय घेण्यास विरोध केला आहे. मात्र, हे प्रस्ताव मंजुर करायचेच यासाठी स्थायी समितीही हट्टाला पेटली असून शुक्रवारी (दि.२८)बैठकीत त्याचे पडसाद उमटले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे यांनी प्रस्ताव सादर न केल्याने त्यांना धारेवर धरण्यात आलेच. परंतु समितीचा आणि न्यायालयाच्या अवमानाला सामोरे जावे लागेल असे सांगून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. शनिवारी (दि. २९) समितीची पुन्हा सभा होणार असून अशावेळी उत्तरे देण्यास तयार राहा असा दमच त्यांना भरण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समितीने केला प्रतिष्ठेचा प्रश्नमहासभेचा मात्र विरोधनगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची कोंडी

नाशिक- महापालिकेत सध्या १५७ कोटी रूपयांच्या भूसंपादनाचा प्रश्न गाजत असून महासभेने स्थायी समितीवर प्राधान्य धोरणानुसार कोणताही निर्णय घेण्यास विरोध केला आहे. मात्र, हे प्रस्ताव मंजुर करायचेच यासाठी स्थायी समितीही हट्टाला पेटली असून शुक्रवारी (दि.२८)बैठकीत त्याचे पडसाद उमटले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे यांनी प्रस्ताव सादर न केल्याने त्यांना धारेवर धरण्यात आलेच. परंतु समितीचा आणि न्यायालयाच्या अवमानाला सामोरे जावे लागेल असे सांगून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. शनिवारी (दि. २९) समितीची पुन्हा सभा होणार असून अशावेळी उत्तरे देण्यास तयार राहा असा दमच त्यांना भरण्यात आला.

शहरातील २८ आरक्षीत भूखंडांना १५७ कोटी रूपयांचा मोबदला देण्यासाठी प्रशासनाकडून स्थायी समितीने प्रस्ताव तयार करून घेतला आहे. तो मांडण्याच्या आत गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत भाजप आणि शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांनी त्यास कडाडून विरोध केला. आरक्षीत भूखंड प्राधान्यक्रमासाठी सादर करण्याचे धोरण ठरविण्याचा प्रस्ताव असल्याने तो महासभेवरच मांडला पाहिजे असा ठराव महासभेत करण्यात आला. त्यानंतरही समितीने भूसंपादनाचे प्रस्ताव मंजुर करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी नगरविकास खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार नगरविकास खात्याने १५७ कोटी रूपयांच्या भूसंपादन प्रस्तावांना स्थगिती दिली आहे.स्थायी समितीच्या गेल्या मंगळवारी (दि.२५) झालेल्या बैठकीत नगररचना विभागाचे सहायक संचालक मनोहर भार्गवे यांनी भूसंपादनाचे अधिकार हे स्थायी समितीचे असतात असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतही प्रस्ताव न मांडल्याने भागर्व यांना जाब विचारण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा