नाशिक महापालिकेची अर्थ सत्ता पुन्हा भाजपकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 11:53 AM2021-03-09T11:53:56+5:302021-03-09T11:54:05+5:30

आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Nashik Municipal Corporation means power again to BJP | नाशिक महापालिकेची अर्थ सत्ता पुन्हा भाजपकडेच

नाशिक महापालिकेची अर्थ सत्ता पुन्हा भाजपकडेच

Next


नाशिक- विरोधकांनी अनेक प्रयत्न करूनही आपसातील एकोप्या अभावी नाशिक महापालिकेची स्थायी समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यात सत्तारुढ भाजपला यश आले आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे गणेश गीते यांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली आहे.


आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज सकाळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य सभागृहात आलेच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तसेच भाजपला समर्थन करणारे मनसेचे सदस्य उपस्थित होते. गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने अखेरीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी गीते यांची निवड झाल्याचे घोषित केले.


स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य असून मनसेने भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे अडचण नव्हती. परंतु शिवसेनेने सुरुवातीला प्रतिष्ठेचा प्रश्न केला पण अन्य विरोधकांनी साथ दिली नाही. त्यामुळे घोडेबाजार वाढत असल्याचे कारण देऊन शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Nashik Municipal Corporation means power again to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.