शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपा : अग्निशामक दलाच्या चालकाने केला १५ हजार लिटर डिझेलचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:02 IST

पावत्या शहरातील त्र्यंबक नाक्यावरील एका पेट्रोलपंपचालकाकडे जमा करून भोळे याने प्रत्यक्षरीत्या वाहनांमध्ये इंधन न भरता १५ हजार २८० लिटर डिझेल खरेदीचा घोटाळा करून परस्पर डिझेलची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

ठळक मुद्देसुमारे १५ हजार २८० लिटर डिझेल वाहनांमध्ये भरल्याच्या पावत्या नऊ लाख ५२ हजार रुपयांचे डिझेल भरल्याचे दाखवून डिझेलची विल्हेवाट भोळे वर्षभरापासून पालिकेच्या सेवेतून महाजन यांनी निलंबित केले

नाशिक : अग्निशामक दलाचे बंब व वॉटर टॅँकरमध्ये इंधनाचा भरणा करण्याच्या नावाखाली सुमारे नऊ लाख ५२ हजार रुपयांचे डिझेल भरल्याचे दाखवून मनपाच्या मालेगाव स्टॅन्ड कार्यशाळेतून पावत्या घेऊन परस्पररीत्या बंबचालक संशयित रवींद्र अंकुश भोळे याने सुमारे १५ हजार लिटर डिझेलची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अग्निशामक दलाच्या मुख्यालयात कर्तव्य बजावणा-या भोळे या बंबचालकाने २७ आॅक्टोबर २०१४ ते ७ मार्च २०१८ पर्यंत अग्निशामक दलाचे बंब व वॉटर टॅँकरमध्ये डिझेल भरणा केल्याचे वेळोवेळी दाखवून एकूण सुमारे १५ हजार २८० लिटर डिझेल वाहनांमध्ये भरल्याच्या पावत्या महापालिकेच्या कार्यशाळेतून घेतल्या. सदर पावत्या शहरातील त्र्यंबक नाक्यावरील एका पेट्रोलपंपचालकाकडे जमा करून भोळे याने प्रत्यक्षरीत्या वाहनांमध्ये इंधन न भरता १५ हजार २८० लिटर डिझेल खरेदीचा घोटाळा करून परस्पर डिझेलची विल्हेवाट लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुख्य अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल चुडामण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित भोळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ सालापासून फसवणुकीचा प्रकार होऊनही सुमारे चार वर्षांनंतर बुधवारी (दि.७) भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला हे विशेष !भोळे याने वाहनांमध्ये इंधन न भरता मनपाच्या नोंदवहीत कुठल्याही प्रकारच्या नोंदी न करता डिझेल खरेदी करून परस्पर अपहार केल्याचे उघड झाले आहे. भोळे यास वर्षभरापासून पालिकेच्या सेवेतून महाजन यांनी निलंबित केले आहे. त्याची विभागीय चौकशीदेखील सुरू असून दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. गिरी करीत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfireआग