शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

नाशिक महापालिका निवडणूक : प्रभागरचनेत भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचीच रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:29 IST

Nashik Municipal Election News in MarathiL: नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापू लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीतही अंतर्गतही बऱ्याच राजकीय घटना घडत आहेत. 

Nashik Municipal Elections:महापालिकेची प्रभागरचना अनुकूल असेल तर महापालिकेतील विजय सोपा मानला जातो, त्यामुळे प्रशासनाने कितीही निरपेक्षपणे काम करण्याचा प्रयत्न केला तरी प्रभाग रचनेवर अप्रत्यक्षरीत्या राजकीय दबाव असतोच. यंदा राज्यात महायुतीची सत्ता असली तरी भाजपला नाशिकची सत्ता पुन्हा हवी असल्याने त्यादृष्टीने व्यूहरचना केली जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शिंदेसेनेकडूनही त्या दृष्टीनेच पावले टाकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्सीखेच वाढण्याची शक्यता आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नाशिक महापालिकेच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या असून त्या दृष्टीने शासनाने निवडणूक कार्यक्रम देखील घोषीत केला आहे. ११ ते १६ जून दरम्यान प्रभाग रचना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रगणक गट तयार करावे लागणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही नंतर करण्यात येणार आहे. 

२२ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २५ दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र, प्रशासकीय तयारीबरोबरच ही राजकीय लढाईची देखील तयारी असण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना भाजपाने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. त्याचा फायदा भाजपाला झाला होता. आणि ६६ नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भाजप सरकारची राज्यातील प्रभाग रचना रद्द केली होती. 

आता तीन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रभाग रचना तयार करण्यात येणार होती. त्यावेळी आधी दोन आणि नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना करताना देखील महापालिकेतील अनेक बाहुबली नगरसेवक तसेच काही राजकीय नेत्यांनी आपल्या सोयीची प्रभाग रचना तयार केल्याचा आरोप होत होता. 

आपल्या पॅनलचे आणि सोयीचे नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रचंड प्रभाग रचनेत बदल करण्यात आला होता. अशा प्रकारच्या चर्चा होत होत्या.

यंदा मात्र, राज्यात महायुतीचे सरकार असले तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या प्रभागरचनेवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्रे असल्याने भाजपचे स्थानिक नेते त्यामुळे वेगवेगळे दावे करत आहेत. तर दुसरीकडे नगरविकास खात्याची सूत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेवर प्रभाव कोणाचा यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

प्रभागरचनेचा असा आहे कार्यक्रम

 प्रगणक गटांची मांडणी करणे व प्रारूप प्रभागरचना करणे- ११ ते १६ जून २०२५

जनगणनेची माहिती तपासणे १७ ते १८ जून

 स्थळ पहाणी १९ ते २३ जून, प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवणे - ४ ते ८ जुलै

प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवणे - १५ ते २१ जुलै

प्राप्त हरकतींवर सुनावणी घेणे- २२ ते ३१ जुलै,

अंतिम प्रारूप प्रभागरचना निवडणूक आयोगला पाठवणे- १ ते ७ ऑगस्ट

अंतिम प्रभागरचनेची राजपत्रात प्रसिद्धी- २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक 2024Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा