शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये काकाने भाजपात प्रवेश करताच पुतण्याने दिला राजीनामा

By संजय पाठक | Updated: December 29, 2025 17:57 IST

Nashik Municipal Corporation Election: विधानसभा निवडणूकीत नाशिक पश्चीम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप हा लबाडांचा पक्ष असे म्हणून टीका केली होती. परंतु त्याच दिनकर पाटील यांना भाजपाने सन्मानाने प्रवेश दिल्याने त्यांच्या आधी भाजपात काम करणारे त्यांचे पुतणे प्रेम दशरथ पाटील यांनी आज राजीनामा दिला आहे.

- संजय पाठकनाशिक- विधानसभा निवडणूकीत नाशिक पश्चीम मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी भाजप हा लबाडांचा पक्ष असे म्हणून टीका केली होती. परंतु त्याच दिनकर पाटील यांना भाजपाने सन्मानाने प्रवेश दिल्याने त्यांच्या आधी भाजपात काम करणारे त्यांचे पुतणे प्रेम दशरथ पाटील यांनी आज राजीनामा दिला आहे. प्रेम पाटील हे शिवसेनेचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र आहेत. 

दिनकर पाटील यांचा प्रवास जनता दल, काँग्रेस, बसपा आणि भाजपा असा होता. २०१७ मध्ये ते भाजपाकडून प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आले हेाते. पक्षाने त्यांना सभागृह नेतापद तसेच स्थायी समिती सभापती देखील दिले. परंतु पुढे लोकसभा आणि नंतर विधान सभा निवडणूकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. नाशिक पश्चीम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली हेाती. याच वेळी त्यांचे पुतणे प्रेम पाटील हे भाजपात दाखल झाले होते. त्यांनी भाजपच्या प्रचारासाठी या मतदार संघात बरेच परीश्रम घेतले. आता प्रेम पाटील हे प्रभागातून इच्छूक होते. त्यांनी भाजपकडे मुलाखत देखील दिली. मात्र, गेल्या आठवड्यात भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिनकर पाटील, त्यांची पत्नी माजी नगरसेविका लता पाटील, पुत्र अमोल पाटील अशा सर्वाना सन्मानाने प्रवेश दिला. त्यानंतर पाटील यांनी या प्रभागात आपल्या सोयीचे उमेदवार देखील परस्पर घाेषीत केले. त्यानंतर प्रेम पाटील यांनी पक्षाच्या वरीष्ठांना याबाबत अवगत केले. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस प्रेम पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nephew Resigns as Uncle Joins BJP in Nashik

Web Summary : Dinakar Patil's BJP entry in Nashik prompted his nephew, Prem Patil, to resign. Prem, a former Shiv Sena leader's son, felt slighted after Dinakar, a past critic, was welcomed back into the party and promoted favored candidates, leading to his resignation after lack of response from seniors.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा