शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका : महासभेत मडकी फोडल्याने उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 13:50 IST

शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ वाढला त्यामुळे भानसी यांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

ठळक मुद्देभाजपा सेनेच्या महासभेत तुंबळ वाकयुद्ध झाले महापौर रंजना भानसी यांनी पंधरा मिनिटे कामकाज तहकूब केले.सुनील गोडसे यांनी सभागृहाच्या मध्यभागी मडके फोडले

नाशिक : पाणी पुरवठ्याच्या समस्येवर बोलू देत नाही म्हणून संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने सभागृहात आणलेले मटके फोडले त्याचा एक तुकडा भाजप नगरसेविकेला लागल्याने आज एकच गोंधळ उडाला. या मुळे भाजपा सेनेच्या महासभेत तुंबळ वाकयुद्ध झाले गोंधळामुळे महापौर रंजना भानसी यांनी पंधरा मिनिटे कामकाज तहकूब केले.नाशिक महापालिकेची महासभा आज रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले यावेळी नाशिकरोड येथील जयभवानी रोडवर पाणी पुरवठा होत नसल्याने शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे यांनी विशेष बॅनर परिधान करून बरोबर रिकामे मटके घेऊन आले होते त्यांना महापौर भानसी यांनी बोलू दिल नसल्याने त्यांनी सभागृहाच्या मध्यभागी मटके फोडले त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला सुनील गोडसे यांना बोलू द्या अशी मागणी शिवसैनिकांनी आक्रमक पणे केली. त्याचवेळी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या डोक्याला उडालेला तुकडा लागल्याने भाजपाच्या महिला नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ वाढला त्यामुळे भानसी यांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.दरम्यान सभा तहकूब झाल्यानंतर देखील दोन्ही पक्षात गोंधळ झाला भाजपा नगरसेवक यांनी गोडसे यांनी माफी मागावी तसेच त्यांना सभागृहातून बडतर्फ करा अशी घोषणा सुरू केल्या आहेत

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRanjana Bhansiरंजना भानसीBJPभाजपाShiv Senaशिवसेना