नाशिक-मुंबई विमानसेवा २७ मार्चपासून
By Admin | Updated: February 3, 2016 23:29 IST2016-02-03T23:24:41+5:302016-02-03T23:29:59+5:30
नाशिक-मुंबई विमानसेवा २७ मार्चपासून

नाशिक-मुंबई विमानसेवा २७ मार्चपासून
नाशिक : ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून, येत्या २७ मार्चपासून मुंबई-नाशिक आणि नाशिक ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. एअर इंडियांतर्गत अलायन्स एअरने त्यासंदर्भात अधिकृतरीत्या एचएएलला पत्र दिले आहे.
नाशिकहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी अनेक त्रुटी दूर केल्यानंतर आणि ओझर येथे नागरी हवाई सेवेसाठी टर्मिनल उभारल्यानंतरही विमान सेवा सुरू होत नव्हती; मात्र अलायन्स एअरने नाशिकमध्ये विमान सेवेचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार फेबु्रवारी महिन्यातच ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते; मात्र तो मुहूर्त लांबला आता २७ मार्च ही तारीख कंपनीने जाहीर केली आहे.
(प्रतिनिधी)