नाशिकमध्ये ‘मनसे’ उमेदवाराचे प्रचार फलक फाडले
By Admin | Updated: February 18, 2017 14:02 IST2017-02-18T13:49:34+5:302017-02-18T14:02:09+5:30
महापालिका निवडणूकीचे मतदान दोन दिवसांवरयेऊन ठेपले असून विविध राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या

नाशिकमध्ये ‘मनसे’ उमेदवाराचे प्रचार फलक फाडले
नाशिक : महापालिका निवडणूकीचे मतदान दोन दिवसांवरयेऊन ठेपले असून विविध राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या असून कुरघोडीचे राजकारणही पहावयास मिळत आहे; मात्र शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास अशोकस्तंभ येथे एका मनसे उमेदवाराने लावलेले प्रचार फलक अज्ञात इसमांनी फाडल्याचे सकाळी उघडकीस आले. विशेष म्हणजे, शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज ठाकरे यांची सभा येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पार पडली होती. सभेला काही तास उलटत नाही तोच असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.