शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक थंडी नाशिकला;पारा पुन्हा ८ अंशापर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 13:33 IST

संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती.

ठळक मुद्देपारा थेट ८ अंशापर्यंत खाली आला हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला

नाशिक : शहरासह जिल्हा पुन्हा गारठला असून किमान तपमानात सातत्याने घसरत होत असून पारा रविवारी (दि.७) पुन्हा ८ अंशापर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना थंडीची कमालीची तीव्रता जाणवली. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. पहाटे जॉगिंग ट्रॅकवरील फेरफटका मारणा-यांची गर्दी रविवार असूनही ओसरली होती.मागील बुधवारपर्यंत शहराचे किमान तपमान १० अंशाच्या पुढे सरकलेले होते. यामुळे बोच-या थंडीपासून नागरिकांना काही अंशी दिलासाह मिळाला होता; मात्र गुरूवारपासून पुन्हा तपमान घसरू लागल्याने थंडीची तीव्रतेतही वाढ होऊ लागल्याने नाशिककरांकडून शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरूवात झाली. १०.६ अंशापर्यंत वर सरकलेला पारा थेट ८ अंशापर्यंत खाली आला आहे. नाशिकमधील निफाड तालुका सर्वाधिक गारठला असून तपमान ८ अंशापेक्षाही खाली घसरले आहे.संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त करून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती. मात्र किमान तपमानाचा पारा या आठवड्यात दोनवेळा पुन्हा वर सरकल्याने थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिकांकडून व्यक्त होत होती, परंतु शनिवारपासून तपमान कमालीचे घसरू लागले. रविवारी ८ अंशावर पारा आल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाश्किची नोंद झाली. एकूणच वाढत्या थंडीच्या कडाक्याने नाशिककर हैराण झाले आहे. दिवसाही नागरिकांकडून उबदार कपड्यांचा वापर केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.प्रमुख शहरांचे किमान तपमान असेमालेगाव ११.६, जळगाव ८.२, सातारा १२.२, नागपूर ११, सांगली १४.८, महाबळेश्वर ११.५, अहमदनगर ११.२, पुणे १०.९, कोल्हापूर १६.३, सोलापूर १३.९, परभणी १२.२, रत्नागिरी १५.८, नांदेड १३,

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र