नाशिक बाजार समिती : पिंगळे गटाचे वर्चस्व
By Admin | Updated: October 9, 2015 01:24 IST2015-10-09T01:24:09+5:302015-10-09T01:24:37+5:30
नाशिक बाजार समिती : पिंगळे गटाचे वर्चस्व

नाशिक बाजार समिती : पिंगळे गटाचे वर्चस्व
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील प्रक्रिया गटाची निवडणूक गुरुवारी (दि.८) होऊन या निवडणुकीत माजी खासदार बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या गटाचे प्रवीण नागरे हे बिनविरोध निवडून आले. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई व सहनिवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात ही प्रक्रिया गटाची निवडणूक सकाळी ११ वाजता घेण्यात आली. प्रक्रिया गटासाठी तीन मतदार होते. त्यात प्रवीण नागरे यांनी प्रक्रिया गटासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जासाठी सूचक म्हणून सभापती देवीदास पिंगळे यांनी, तर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. प्रवीण नागरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी प्रवीण नागरे यांची नाशिक बाजार समितीच्या प्रक्रिया गटातून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.